Eastern Expressway वरील पूल आणि उड्डाणपुलांच्या डागडुजीची जबाबदारी महापालिकेच्या खांद्यावर

475
Eastern Expressway वरील पूल आणि उड्डाणपुलांच्या डागडुजीची जबाबदारी महापालिकेच्या खांद्यावर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

पूर्व द्रुतगती महामार्ग (Eastern Expressway) एमएमआरडीएच्या ताब्यातून महापालिकेच्या ताब्यात आल्याने या द्रुतगती महामार्गावरील सर्व उड्डाणपूल, भुयारी मार्गाची डागडुजी करण्याची जबाबदारी महापालिकेच्या खांद्यावर आली आहे. त्यामुळे या द्रुतगती महामार्गावरील पुलांच्या डागडुजीसाठी तब्बल २१ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून अर्थात एमएमआरडीएकडून पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग महापालिकेच्या ताब्यात घेण्यात आल्या असून या महामार्गावरील पूल, उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग आदीही महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आल्या आहे. त्यामुळे या पूर्व द्रुतगती महामार्गावरील (Eastern Expressway) पूल आणि उड्डाणपुलांची डागडुजी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

(हेही वाचा – Trichy Airport : एयर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड ; १४० प्रवाशांसह विमान हवेत घालते घिरट्या  )

या मार्गावरील एम पश्चिम विभागातील चेंबूर येथील अण्णाभाऊ साठे उड्डाणपूल आणि मुलुंड येथील नवघर उड्डाणपूल या दोन पुलांचे एमएमआरडीएने आयआयटीच्या मदतीने स्ट्रक्चरल ऑडीट अहवाल तयार केले होते, हे अहवाल त्यांनी महापालिकेला सादर केल्यानंतर या महामार्गावरील सर्वच पूल, उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांची दुरुस्ती करण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Eastern Expressway)

महापालिकेने यासाठी स्ट्रक्टॉनिक्स कन्सल्टींग इंजिनिअरींग यांची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली असून त्यांच्या अहवालानुसार काही पुलांची डागडुजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जून महिन्यात निविदा मागवण्यात आली होती आणि ही निविदा १८ जून रोजी उघडण्या आल्यांनतर सप्टेंबर महिन्यात याचा प्रस्ताव मंजूर केला. याकामांसाठी विविध करांसह तब्बल २६ काटी ४३ लाख रुपये खर्च करण्यात येत असून या कामांकरता पी बी कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे. तब्बल २८ टक्के उणे दरात हे काम मिळवले आहे.

(हेही वाचा – Shikhar Savarkar Puraskar : सावरकर स्मारकात संपन्न झाला ‘शिखर सावरकर पुरस्कार प्रदान सोहळा आणि शस्त्रपूजन’)

या कामांमध्ये रेल्वे विभागाकडून विविध रेल्वेवरील उड्डाणपुलांवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अँटी क्रॅश बॅरियर बसवण्याच्या सूचना पूल विभागाला केल्या होत्या. त्यानुसार या कामांचाही यामध्ये समावेश असल्याची माहिती पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Eastern Expressway)

पूर्व द्रुतगती महामार्गावरील ‘या’ पुलांची होणार डागडुजी
  • चेंबूर सुमन नगर, अण्णाभाऊ साठे उड्डाणपूल
  • मुलुंड नवघर उड्डाणपूल
  • अमर महल जंक्शन उड्डाणपूल
  • कुर्ला पश्चिम येथील एलबीएस जंक्शन एससीएलआर उड्डाणपूल
  • घाटकोपर मानखुर्द लिंक रोड येथील उड्डाणपूल
  • शीव पनवेल महामार्ग आणि महाराष्ट्र नगर मानखुर्द यांना जोडणारे भुयारी मार्ग
  • विविध रेल्वे उड्डाणपुलांवर अँटी क्रश बॅरियर बसवणे

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.