सेवानिवृत्तीचे वय आणि पेन्शनची रक्कमही वाढू शकते, केंद्र सरकार योजना बनवण्याच्या तयारीत

केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय आणि सेवानिवृत्तीची रक्कम वाढवून देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी हा दिलासादायक निर्णय ठरणार आहे. यासाठीचा  प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार समितीने दिला आहे.

दरमहा किमान 2000 रुपये पेन्शन दिली जाणार

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने म्हटले आहे की, देशात निवृत्तीचे वय वाढवण्यासोबतच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीमही सुरू केली पाहिजे. या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांना दरमहा किमान 2000 रुपये पेन्शन दिली पाहिजे. काम करण्याच्या वयाची लोकसंख्या वाढवायची असेल तर निवृत्तीचे वय वाढवण्याची नितांत गरज आहे. सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवरील दबाव कमी करण्यासाठी हे केले जाण्याची शक्यता आहे. या प्रयत्नात असंघटित क्षेत्रात राहणारे, दुर्गम भागात राहणारे, निर्वासित, स्थलांतरित ज्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्याचे साधन नाही, अशांचाही समावेश व्हायला हवा, पण त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. 2019 मध्ये भारताच्या लोकसंख्येच्या जवळपास 10 टक्के किंवा 14 कोटी लोक ज्येष्ठ नागरिकांच्या कॅटगरीत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here