सत्ताधारी-विरोधक दोघांना पायाखाली रगडतो; Manoj Jarange यांची राजकारण्यांवर पातळी सोडून वैयक्तिक टीका

227
सत्ताधारी-विरोधक दोघांना पायाखाली रगडतो; Manoj Jarange यांची राजकारण्यांवर पातळी सोडून वैयक्तिक टीका
सत्ताधारी-विरोधक दोघांना पायाखाली रगडतो; Manoj Jarange यांची राजकारण्यांवर पातळी सोडून वैयक्तिक टीका

“सत्ताधारी आणि विरोधक दोघांना पायाखाली रगडतो, समाजाने साथ द्यावी. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि प्रसाद लाड (Prasad Lad) यांना समोर करून काड्या करत आहेत. दरेकरने कपाळावर कुंकू लावले तर, अतिशय सुंदर दिसेल, सखू सारखा दिसेल, अशी अत्यंत हीन पातळीवरील व्यक्तीगत टीका मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली. त्यांनी २४ जुलै रोजी उपोषण स्थगित केले आहे. त्या वेळी त्यांनी ही खालच्या पातळीवरील विधाने केली.

(हेही वाचा- School Bus Accident: बेळगावात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूलबस उलटली; सहा विद्यार्थी गंभीर जखमी)

वॉरंट आले, तरी मी जात नसतो

राजकीय नेत्यांवर गरळओक करतांना मनोज जरांगे (Manoj Jarange) पुढे म्हणाले की, ” या अटक वॉरंट प्रकरणात, उद्धव ठाकरे यांचा हात असू शकतो. नाटकवाला त्यांच्या जवळचा आहे. पुन्हा अटक वॉरंट का काढले ? न्याय, गृह विभाग फडवणीस यांच्याकडे आहे. हा देवेंद्र फडणवीस यांनी रचलेला डाव आहे. न्यायाधीश हे फडवणीस यांचे नातेवाईक आहेत. मला अटक करून आत टाकायचा फडणवीस यांचा अट्टहास का ? ईडीचे कितीतरी वॉरंट कॅन्सल झाले आहेत आणि त्यामध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), अनिल देशमुख (Anil Deshmukh), नवाब मलिक (Nawab Malik) यांचे नाव आहे. बाकीचे देव बाप्पा चांगले मग हे देव बाप्पा असे कसे? मला वॉरंट आले, तरी मी जात नसतो, कोर्टाने पण फडवणीस यांचे ऐकणे सोडावे, अशी दर्पोक्ती जरांगे यांनी केली.

भाजपसोबत मराठ्यांनी राहू नका

जरांगे यांनी मराठ्यांना भाजपविरोधात मतदान करण्यासाठीही चिथवले आहे. ते म्हणाले की, “दरेकर मराठा आहेत का, हे शोधावे लागेल. मी काही झुकत नाही, जेल मध्ये जायला तयार आहे, टाका आता जेलमध्ये. देवेंद्र फडणवीस यांना कुठेच मी गठलो नाही, भाजपचे सरकार येणार नाही. मला आत टाकून फडवणीस यांना निवडणूक काढायची आहे. मी आत गेलो, तरी भाजपची एकही सीट आली नाही पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांचा बिमोड करा. भाजप सोबत मराठ्यांनी राहू नका. मी मेलो तरी, माझ्या आत्म्याला शांती तेव्हाच मिळेल, जेव्हा हे सर्व पडतील.”  (Manoj Jarange)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.