वीज पुरवठा विभागाच्या कामगारांना बेस्टने दिलेल्या सेफ्टी बूटाचे काही महिन्यांतच तुकडे झाले आहेत. विजेचे काम करताना कर्मचा-यांना विजेचा झटका लागू नये, म्हणून हे बूट देण्यात आले होते. पण, काही महिन्यांतच बूटची झालेली अवस्था बघून त्यांच्या उच्च दर्जावर आता टीका होऊ लागली आहे.
बुटांचे दोन तुकडे
प्रत्यक्ष विजेचे काम करणा-या कर्मचा-यांना ठराविक कालावधीनंतर सेफ्टी बूट दिले जातात. अशा कामगारांची संख्या 15 हजारांहून अधिक आहे. काही महिन्यांपूर्वी काही कामगारांना असे बूट देण्यात आले. मात्र, थोड्याच दिवसांत त्यांचे सोल निखळू लागले आहेत. तात्पुरती दुरुस्ती करुन कामगारांनी हे बूट वापरले, मात्र काही जणांच्या बूटांचे तर दोन तुकडेच झाले आहेत.
( हेही वाचा: बॉम्बस्फोट करणाऱ्यांशी मलिकांचे व्यवहार! फडणवीसांचा घणाघात )
तेही प्रशासनाला जमत नाही
भ्रष्टाचारामुळे बुटांच्या दर्जाशी तडजोड झाली आहे. कामगारांना विजेचा झटका लागू नये, जड यंत्र पायावर पडून ते जखमी होऊ नये म्हणून हे बूट दिले जातात. मात्र, त्यांचा दर्जा बघितल्यावर ते का दिले, असा प्रश्न आहे. उपक्रमासाठी राबणा-या कामगारांना तरी चांगल्या सुविधा पुरवणे अपेक्षित आहे. तेही प्रशासनाला जमत नाही, असा टोला भाजपचे बेस्ट समिती सदस्य प्रकाश गंगाधरे यांनी लगावला आहे.
Join Our WhatsApp Community