राज्यभरात जून महिन्यात मुलांच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. 13 जूनपासून राज्यातील बहुतांश शाळा गजबजणार आहेत. पण शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकांचा खिसा रिकामा करणारी बातमी समोर आली आहे. कारण पहिल्याच दिवशी स्कूल बसच्या दरात 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशनने घेतला आहे.
अनेक मुले घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी स्कूल बसेसचाच वापर करतात. पण या स्कूल बसेसच्या दरात शाळेच्या पहिल्याच दिवसापासून मोठी वाढ करण्यात आली आहे. देशात इंधनाच्या दरांमुळे महागाई वाढली आहे. त्याचा फटका स्कूल बस चालक – मालकांनाही बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता शाळेच्या पहिल्या दिवसापासून स्कूल बसच्या दरात 20 टक्के वाढ करण्यात आली आहे.
( हेही वाचा: शिक्षण ते लग्नापर्यंत ‘या’ योजनांचा लाभ घेत असे जमा करा पैसे! )