- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डी’मेलो मार्गाला जोडणाऱ्या १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाची (Carnac Bridge) मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्बांधणी सुरू आहे. या प्रकल्प अंतर्गत ५५० मेट्रिक टन वजनाची दक्षिण बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वे भागावर ७० मीटरपर्यंत सरकविण्याची कार्यवाही पूर्ण ऑक्टोबर महिन्यात पूर्ण झाल्यानंतर आता दुसरा गर्डर टाकण्याचे शनिवारी रात्री करण्यात येत आहे. रेल्वेच्यावतीने यासाठी विशेष मेगाब्लॉक घेण्यात आल्याने रात्री साडेबारापासून हे गर्डर बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
(हेही वाचा – Wankhede Stadium @50 : वानखेडे मैदानावर चेंडूंनी बनवलेलं डिझाईन पोहोचलं गिनीज बुकमध्ये)
दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल (Carnac Bridge) महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. या पुलाच्या रेल्वे हद्दीतील पहिल्या गर्डरचे काम रेल्वेने घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे ऑक्टोबर महिन्यात पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर २०२४ पर्यंत दुसरा गर्डर टाकण्याचे अपेक्षित होते.
(हेही वाचा – Google Map ने चुकीचा रस्ता दाखवला आणि UPSC चे २० ते २५ विद्यार्थी परीक्षेपासून राहिले वंचित)
परंतु यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक जाहीर करणे अवाश्यक होते, परंतु हा ब्लॉक मिळत नसल्याने अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी काही दिवसांपूर्वी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन विनंती केली होती, त्यानंतर मागील आठवड्यात महापालिका आयुक्त कार्यालयात मध्य रेल्वेचे डिआरएम आले असता त्यांनी कर्नाक बंदर येथील पुलाच्या दुसऱ्या गर्डर करता ब्लॉक घेण्याची विनंती केली आणि त्यानुसार रेल्वे ही मागणी मान्य करून शनिवारी रात्री साडेबारा वाजता हा ब्लॉक जाहीर केला. त्यानुसार मध्य रेल्वेने शनिवारी रात्री साडेबारा वाजता हा ब्लॉक जाहीर केल्याने या कर्नाक पुलाच्या (Carnac Bridge) दुसऱ्या गर्डरचे काम पूर्ण केले जाणार आहे. या दुसऱ्या गर्डरचे काम पूर्ण झाल्यानंतर वरील बांधकाम आणि पोहोच मार्गाचे बांधकाम करून यापुलाचे सर्व बांधकाम ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण केले जाणे अपेक्षित असल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community