Transport Department च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदोन्नती व बदली होणार

150
Transport Department च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदोन्नती व बदली होणार

लोकसभेच्या निवडणुकांसाठी (Lok Sabha Election) राज्यात लागलेली आचारसंहिता शिथिल होताच परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदोन्नती व बदली होणार आहे. परिवहन विभागाच्या विभागीय पदोन्नती समितीने (DPC) तयार केलेल्या अधिकाऱ्यांच्या यादीची फाइल सध्या मुख्यमंत्री कार्यालयात आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांची यापूर्वीच सही झाल्याचे परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (Transport Department)

राज्याच्या परिवहन विभागातील २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदोन्नती होणार आहे. परिवहन विभागाच्या विभागीय पदोन्नती समितीने (DPC) अशा अधिकाऱ्यांची यादी तयार करून परिवहन मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री कार्यालयात पाठवले. त्या दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने आरटीओच्या पदोन्नतीचे ‘पासिंग’ रखडले होते. आता आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. यात ‘त्या’ चार वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या नावाचा देखील समावेश आहे. (Transport Department)

(हेही वाचा – Mumbai Police : १० हजार द्या महिनाभर सुट्टीवर जा; सशस्त्र पोलीस दलातील ‘हजेरी सेटिंग’ एसीबीच्या कारवाईमुळे उघड)

मागील तीन ते चार वर्षांपासून अधिकाऱ्यांची पदोन्नती रखडली होती. ती आता मार्गी लागत आहे. या बदल्या ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. मात्र यात देखील आर्थिक व्यवहार झाल्याचे आरटीओच्या वर्तुळात बोलले जात आहे. राज्यातील लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election) पार पडताच या प्रक्रियेला गती आली आहे. विविध अधिकारी अद्याप बदलीचा आदेश निघाला नसल्याने मागील काही दिवसांत मुंबईला खेट्या मारून आपल्या आवडत्या जागी पोस्टिंग मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत. कोणत्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न सफल झाले हे पदोन्नतीचे आदेश निघताच कळणार आहे. (Transport Department)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.