कुर्ल्याचे शीतल तलाव कात टाकणार

165
मुंबई शहर भागातील शीव तलाव, पूर्व-उपनगरातील शितल तलाव व पश्चिम उपनगरातील डिगेश्वर तलावात प्रवाहित होणारे बिन पावसाळी अंतर्गत प्रवाह दुसरीकडे वळवण्याविषयी प्रायोगिक तत्वावर अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे या तलावात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने उपाययोजना आखण्यात येत असून पहिल्या टप्प्यात शीतल तलावातील प्रदुषण रोखत त्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे
राष्ट्रीय हरितलवादाने पर्यावरण सुरक्षा समिती आदेशानुसार, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था किंवा राज्य सरकारच्या इतर संबंधित खात्यांनी निर्माण होणा-या सांडपाण्यावर १०० टक्के प्रक्रिया केली जाईल याची खात्री करावी, अन्यथा त्याची नुकसान भरपाई राज्य शासनाने ०१ एप्रिल २०२० पासून वसूल करावी. तसेच अशी नुकसान भरपाईची वसुली राज्य शासन करू न शकल्यास त्याची भरपाई करण्याचेही निर्देश त्यांनी दिले होते.
त्यानुसार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार मुंबई हद्दीमधील नदया, तलाव किंवा खाडीयामध्ये बिन पावसाळी अंतर्गत प्रवाह तथा बिना प्रक्रिया मलप्रवाह तसेच अर्धवट प्रक्रिया केलेले मलप्रवाह येऊन खाडीतील पाण्याचे प्रदूषण होत असल्याने प्रतिबंधकात्मक उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुंबई शहर भागातील शीव तलाव, पूर्व-उपनगरातील शीतल तलाव व पश्चिम उपनगरातील डिगेश्वर तलावात प्रवाहित होणारे बिन पावसाळी अंतर्गत प्रवाह दुसरीकडे वळवण्याविषयी प्रायोगिक तत्वावर अभ्यास करुन सल्लागाराकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन घेतला. त्यानुसार यातील शीव तलावात होणारे प्रदूषण रोखण्याची उपाययोजना आखली आहे. कुर्ला शीतल तलाव येथे पुनरुज्जीवन करून  मलजल प्रवाहात अटकाव करत याचे सुशोभिकरणाचे काम करण्यासाठी कंत्राटदाराची निवड केली आहे. यासाठी एएसबी एंटरप्राइजेस ही कंपनी पात्र ठरली असून यासाठी विविध करांसह साडेसात कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.  पुढील दीड वर्षांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे मलनि:स्सारण प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.