वरळीतील जागा MMRC ला कायमस्वरुपी दिली

3753
वरळीतील जागा MMRC ला कायमस्वरुपी दिली
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाचे काम आत ९२ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले असून आता या प्रकल्पातील जागा मेट्रोच्या नावावर कायमस्वरुपी चढवण्यात येणार आहे. वरळीतील महापालिकेची भाडेकरारावर दिलेल्या जागेपैकी या मेट्रो रेल्वेसाठी सुमारे ५०० चौरस मीटरची जागा कायस्वरुपी दिल्या आहेत. (MMRC)

(हेही वाचा – Government College of Pharmacy Amravati : शासकीय फार्मसी महाविद्यालय अमरावतीची फी संरचना काय आहे?)

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी नोव्हेंबर २०२०मध्ये मुंबई मेट्रो लाईन ३ या प्रकल्पासाठी वरळीतील आय व्हेन रियल्टी लिमिटेड यांच्या वापरात असलेल्या मोकळ्या जमिनीमधील २११ चौरस मीटर आणि २९३ चौरस मीटरची जागा जमिनीखालील कायमस्वरुपी आवश्यक असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी तथा महाव्यवस्थाप (भूमी) यांनी कळवले होते. या जागेचा काही भाग मेट्रो ३ प्रकल्पांच्या इंट्री तथा एक्सिट च्या कामांसाठी आवश्यक असल्यामुळे कायस्वरुपी संपादन करण्याचे मुंबई मेट्रोने ठरवले. (MMRC)

(हेही वाचा – PPF Account New Rules : ऑक्टोबरपासून पीपीएफ खात्यांविषयी ‘हे’ नियम बदलणार)

त्यानुसार नोव्हेंबर २०१७ मध्ये सामंजस्य करार केला आहे. यासाठी महापालिकेकडे मुंबई मेट्रोने ना हरकत प्रमाणपत्र मागवले होते. मुंबई मेट्रोने या जागा संपादित केल्यामुळे त्या जमिनीचा मोबदला तथा नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यामध्ये महापालिका आणि भाडेकरार केलेल्या संस्थेला या नुकसान भरपाईच्या रकमेपैंकी ५०-५० टक्के रक्कमेचे अधिदान केले जाईल. (MMRC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.