न्यायालय म्हणते, गर्दीतही मुली सुरक्षित नाहीत

99

मराठी मालिकांमध्ये काम करणा-या एका 16 वर्षीय मुलीवर मुंबईच्या लोकलमध्ये लैंगिक अत्याचार करणा-या 32 वर्षीय व्यक्तीला विशेष न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा ठोठावली. या घटनेवरुन असे दिसून येते की, मुली कितीही गर्दीत असल्या तरी त्या सुरक्षित नाहीत, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले.

या घटनांमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, ही घटना 2019 मध्ये घडली. पीडिता तेव्हा 16 वर्षांची होती आणि बारावीत शिकत होती. विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रिया बनकर यांनी आरोपीला आयपीसी व पाॅस्कोमधील काही कलमांतर्गत दोषी ठरवत, त्याला तीन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. ही घटना गर्दीच्या ठिकाणी घडली. त्याचा पीडित मुलीवर, तिच्या कुटुंबीयांवर आणि समाजावर विपरीत परिणाम झाला. या घटनांमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होते. मुलींभोवती माणसांचा गराडा असला तरी त्या सुरक्षित नसल्याचे दिसून येते, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले.

( हेही वाचा: दादरच्या पादचारी पुलाखालील ते अडथळे केले महापालिकेने दूर; दादरच्या दुसऱ्या कारवाईने प्रवाशी सुखावले )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.