समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा 120 किमी राहणार असून, यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महामार्गावरील कमाल वेगमर्यादेसंदर्भात वाहतूक विभाग अपर डीजीपींकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच, समृद्धी महामार्गावर दुचाकी, चारचाकी रिक्षा आणि तीन चाकी रिक्षा, तसेच तीन चाकी कोणत्याही वाहनांना संचार करण्याची परवानगी नसणार आहे.
समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा निमय
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरुन जाणा-या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिसूचनेत वेगमर्यादा 120 किमी एवढी निश्चित करण्यात आली आहे. राज्याच्या अपर पोलीस महासंचालकांकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
( हेही वाचा: राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेला स्थगिती; NCERT कडून नोटिफिकेश जारी )
- वाहनचालकासह 8 प्रवाशांची वाहतूक करणा-या प्रवासी वाहनांसाठी समतल भागांत 120 किमी प्रति तास तर घाट आणि बोगद्यांमध्ये 100 किमी प्रति तास
- वाहनचालकासह 9 किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणा-या वाहनांसाठी समतल भागांत 100 किमी प्रति तास तर घाट आणि बोगद्यांमध्ये 80 किमी प्रति तास
- माल आणि सामानाची वाहतूक करणा-या वाहनांसाठी समतल भागांत 80 किमी प्रति तास तर घाट आणि बोगद्यांमध्ये 80 किमी प्रति तास
- या मार्गावर दुचाकी आणि तीन चाकी रिक्षांसह इतर वाहनांना संचार करण्याची परवानगी नाही.