Gram Panchayat Election : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा ‘धुरळा’; ५ नोव्हेंबरला मतदान

137
Gram Panchayat Election : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा 'धुरळा'; ५ नोव्हेंबरला मतदान
Gram Panchayat Election : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा 'धुरळा'; ५ नोव्हेंबरला मतदान

मुंबई, ठाण्यासह महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका रखडल्यामुळे सरकारला टीकेचे धनी व्हावे लागत असताना, राज्य निवडणूक आयोगाने जवळपास अडीच हजार ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यात निवडणुकीचा ‘धुरळा’ उडणार आहे. (Gram Panchayat Election)

राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी मंगळवारी राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. त्यात २ हजार ९५० सदस्यपदाच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांचाही समावेश आहे. त्यासाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे. (Gram Panchayat Election)

मदान यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर २०२३ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. (Gram Panchayat Election)

(हेही वाचा – Bihar Caste Census Survey : बिहारच्या जातनिहाय जनगणनेवर भाष्य करणार नाही – सर्वोच्च न्यायालय)

मतदानाची वेळ अशी…

५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ६ नोव्हेंबर २०२३ रोजी होईल. मात्र गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतमोजणी होईल. (Gram Panchayat Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.