राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत वाढ केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत २० ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरताना सादर करायचे घोषणापत्र संगणक प्रणालीद्वारे भरले जात असल्याने त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाढवली आहे. (Gram Panchayat Elections)
(हेही वाचा – Ajit Pawar : जमीन प्रकरणाशी अर्थाअर्थी संबंध नाही!; अजित पवार यांनी आरोप फेटाळले)
राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या, तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन आयोगाने २० ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सकाळी ११ वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत केली आहे. अन्य प्रक्रिया पूर्व घोषित कार्यक्रमाप्रमाणे पार पडेल. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान ५ नोव्हेंबर २०२३ रोजी होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. (Gram Panchayat Elections)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community