-
प्रतिनिधी
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य शासनाने मुंबई लोहमार्ग पोलिसांतर्गत चार नवीन पोलीस ठाण्यांना (Police Stations) मान्यता दिली आहे. गृह विभागाने जारी केलेल्या सरकारी ठरावानुसार (जीआर) लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) भाईंदर, अंबरनाथ आणि आसनगाव रेल्वे स्थानकांवर नवीन पोलिस ठाणी स्थापन केली जातील. लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) यापूर्वी ही नवीन पोलिस ठाणी स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला होता. नवीन पोलिस ठाण्यांमुळे कल्याण, कुर्ला आणि वसई लोहमार्ग पोलिस ठाण्यांचा भार कमी होऊन प्रवाशाची सुरक्षा अबाधित राहील असे लोहमार्ग पोलीस विभागातील एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण, वसई विरार, बदलापूर इत्यादी महानगरातील वाढती लोकसंख्यामुळे लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर वाढत्या गुन्हेगारीमुळे लोहमार्ग पोलिसांवर पडणारा ताण लक्षात घेता मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर नवीन पोलिस ठाणी (Police Stations) निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रेल्वे पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात नोंदवलेले बहुतेक गुन्हे मोबाईल आणि सामान किंवा वस्तू चोरी आणि खिसा कापणे यांच्याशी संबंधित आहेत. रेल्वे स्थानकांवरही महिलांच्या लैंगिक छळाच्या घटना घडल्या आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, सध्याची रेल्वे पोलिस ठाण्याची हद्द खूप मोठी आहे. कसारा, आसनगाव, वासींद तसेच बदलापूर, अंबरनाथ या ठिकाणी घडणाऱ्या गुन्ह्यांची तक्रार देण्यासाठी प्रवाशांना कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात यावे लागत होते, तसेच गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्यामुळे पोलीस यंत्रणांवर ताण वाढत आहे.
(हेही वाचा – पक्ष बळकटीसाठी Shiv Sena च्या संपर्क प्रमुखांची नियुक्ती)
कसारा आणि कल्याणच्या मध्ये आसनगाव रेल्वे स्थानकात आसनगाव, कल्याण ते बदलापूर दरम्यान अंबरनाथ लोहमार्ग पोलीस ठाणे हे दोन नवीन पोलीस ठाणी, तसेच कुर्ला लोहमार्ग पोलिस ठाण्याची हद्द कुर्ला ते मुलुंड पर्यत असून त्यात लोकमान्य टिळक टर्मिनसचा समावेश आहे. सध्याच्या घडीला उत्तरप्रदेशात जाणाऱ्या बहुतांश मेल एक्सप्रेस या लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस) येथे सुटत आहे, यामुळे दररोज हजारोंच्या संख्येने प्रवाशी येथून प्रवास करतात. लोकमान्य टिळक टर्मिनस हे कुर्ला लोहमार्गच्या हद्दीत येत असल्यामुळे टर्मिनस येथे होणाऱ्या गुन्ह्याची तक्रार देण्यासाठी प्रवाशांना कुर्ला रेल्वे स्थानकात पायपीट करावी लागते. यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस पोलीस ठाणे (Police Stations) नव्याने उभारले जाणार प्रवाशांची पायपीट होणार नाही आणि गुन्ह्यावर अंकुश लावता येईल असे अधिकारी म्हणाले. दरम्यान मीरा भायदंर-वसई विरार दरम्यान नव्याने भायदंर रेल्वे पोलीस ठाणे उभारण्यात येणार आहे.
पोलीस ठाण्यांमधील अंतर किती?
मध्य रेल्वे (CR) मार्गावर, कल्याण नंतर कसारा रेल्वे स्थानकावर सरकारी रेल्वे पोलिसांचे (GRP) स्टेशन आहे – त्यांच्यामधील अंतर ६७-७० किमी आहे. या दरम्यान १२ रेल्वे स्थानके आहेत. त्याचप्रमाणे, पुणे मार्गावर, कल्याण नंतर पुढील रेल्वे पोलिस स्टेशन कर्जत येथे आहे, जे ४६ किमी अंतरावर आहे. पश्चिम रेल्वे (WR) मार्गावर, बोरिवली GRP स्टेशन आणि वसई GRP स्टेशनमधील अंतर १७ किमी आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) किंवा कुर्ला टर्मिनस हे बाहेरील गाड्यांसाठी एक प्रमुख प्रवासी केंद्र म्हणून उदयास आले आहे जिथे मोठी गर्दी असते. सध्या, कुर्ला रेल्वे पोलिस ठाणे सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या टर्मिनसच्या सुरक्षेची जबाबदारी घेत आहे. राज्य सरकारच्या अंतर्गत येणारे जीआरपी या प्लॅटफॉर्मवर दैनंदिन गुन्ह्यांची प्रकरणे हाताळते, तर केंद्राच्या अंतर्गत येणारे रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) देखील रेल्वे स्थानकांवर उपस्थित असते. (Police Stations)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community