गोहत्या प्रकरणी MCOCAअंतर्गत कारवाई करणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा

103
गोहत्या प्रकरणी MCOCAअंतर्गत कारवाई करणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा
गोहत्या प्रकरणी MCOCAअंतर्गत कारवाई करणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा

कायद्यानुसार गो हत्या (Cow slaughter) करणे गुन्हा आहे. मात्र गोहत्तेचा (Cow slaughter) वारंवार गुन्हा केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार यापुढे कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिला. श्रीगोंदा (Shrigonda) येथील कायदा सुव्यवस्थेच्या बाबत सदस्य संग्राम जगताप यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

( हेही वाचा : शाळांमध्ये सीसीटीव्ही आणि लैंगिक अत्याचाराविरोधात कठोर कारवाईची मागणी; आमदार Chitra Wagh यांचा सभागृहात प्रस्ताव

या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर (Dr. Pankaj Bhoyar) म्हणाले, अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील श्रीगोंदा (Shrigonda) येथे २ नोव्हेंबर २०२४ रोजी दोन समाजामध्ये वाद झाला. या वादाचे नंतर मारहाणीत रूपांतर झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तसेच मारहाणीत जखमींना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या एका इसमाचा यात मृत्यू झाला. पोलिसांनी यामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई केल्याचे दिसून येत नाही. (Devendra Fadnavis)

या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हेगाराला अटकही केली. मात्र न्यायालयातून जामिनावर त्याची सुटका झाली. श्रीगोंदा (Shrigonda) शहरातील प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्यात येऊन कोणालाही सोडण्यात येणार नाही, असेही गृह राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले. वारंवार गोहत्येचा गुन्हा दाखल होईल अशा व्यक्तिविरुद्ध संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत म्हणजेच ‘मकोका’खाली  कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी २० मार्च २०२५ या दिवशी विधानसभेत उत्तर देताना घोषणा केली. एखाद्या व्यक्तिविरुद्ध वारंवार गोहत्येचा गुन्हा दाखल होत असल्यास त्याच्याविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.

लव्ह जिहाद प्रमाणे गोहत्या

भाजपाचे आमदार संग्राम जगताप यांनी श्रीगोंदा तालुक्यातील ससाणेनगर भागात घडलेल्या वाद, मारहाण, त्यातून  मृत्यू होणे, तसेच तेथील कुरेशी कुटुंबियांची दहशत, यासंबंधी लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली. नोव्हेंबर २०२४ मध्ये फटाके वाजवण्यावरुन मातंग समाजातील ससाणे कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. त्यात एकाचा मृत्यू झाला तरी त्यावर गुन्हा दाखल झाला नाही अगोदर. साधारण महिना भरानंतर अटक आणि जामीन झाला. संपूर्ण नगर जिल्ह्यात गोतस्करी, गोहत्या यासह अनेक व्यवसाय असलेल्या कुरेशी गँगची दहशत आहे. कुरेशीवर १८ ते २० गुन्हे  दाखल आहेत, असे जगताप यांनी निदर्शनास आणले. या सर्व प्रकरणी स्थानिक पोलीस निरीक्षक यांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. तसेच लव्ह जिहाद प्रमाणे गोहत्या, , गोतस्करी विरोधात ‘मकोका’अंतर्गत कारवाई करा, अशी मागणी जगताप यांनी केली.

मुख्यमंत्री गंभीर

त्यावर गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी उत्तर देताना स्पष्ट केले की, या प्रकरणी कुणीही गुन्हा नोंद करण्यास पुढे न आल्याने पोलिसांनी स्वतः गुन्हा नोंद केला. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. गोतस्करी होत असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री फडणवीस यावेळी सभागृहातच उपस्थित असल्याने याची दखल घेत मकोकाअंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घोषित केला.

हा हिंदुत्वाचा विजय !

गोहत्या करणाऱ्यांविरोधात ‘मकोका’ दाखल व्हावा, ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घेतल्याप्रकरणी त्यांचे मनःपूर्वक आभार. हा कायदा भारतभर लागू होणे तितकेच गरजेचे आहे. ‘मकोका’ बरोबरच पुढे गुन्हेगारास फाशीची शिक्षाही व्हावी, अशी आमची मागणी आहे. गाय ही साऱ्या विश्वाची माता आहे, तिचे संरक्षण व संवर्धन होणे हे भारतीय संस्कृतीत अनादि कालापासून सांगितले आहे. त्यामुळे हा हिंदुत्वाचा विजय आहे.

– महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री देशपांडे

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.