मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) महायुती सरकारसाठी महत्त्वाची ठरली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुती सरकारनं जुलै 2024 पासून ही योजना लागू करत असल्याची घोषणा केली. या योजनेद्वारे ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम देण्यात आली आहे. महायुती सरकारच्या विजयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठी गेमचेंजर ठरली आहे. आता या योजनेला बळकटी देण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या योजेनचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी राज्यसरकार कडून निधी मंजूर (Fund sanctioned by State Govt) करण्यात आला आहे. तसे शासकीय परिपत्रक (GR) सुद्धा काढण्यात आले आहे.
(हेही वाचा – सरकारी संगणकावर AI नको; केंद्र सरकारने जारी केले परिपत्रक)
जीआरमध्ये काय म्हटलंय?
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाटी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णयाक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वकांक्षी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या आराखडा आणि त्याकरिता होणाऱ्या खर्चासाठी तीन कोटी रुपयांची मान्यता देण्यात येत आहे, असं जीआर मध्ये म्हटलं आहे.
सोशल मीडियावर किती खर्च?
या योजनेचा सोशल आणि डिजिटल मीडियावर प्रचार करण्यात येणार आहे. सोशल मीडियावरील (Social Media) खर्चासाठी दीड कोटी आणि डिजिटल मीडियावरील खर्चासाठी दीड कोटी अशा एकूण तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या जाहिराती महिला व बाल विकास विभागाच्या समन्वयाने करण्याच्या सूचनाही जीआरमध्ये (Ladki Bahin Yojana GR) देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सरकारने यापूर्वीच लाडकी बहीण योजनेसाठी 200 कोटींची तरतूद केलेली आहे. त्यातीलच तीन कोटी रुपये हे जाहिरातीसाठी खर्च करण्यात येणार आहेत.
काटेकोर तपासणी
दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने काही निकष घालून दिले होते. मात्र या निकषाकडे कानाडोळा करून अनेक महिलांनी अर्ज केल्याने त्यांच्या अर्जांची पडताळणी करण्यात येत आहे. यातील ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना ही योजना लागू होणार नाहीये. त्यामुळे ज्या महिलांनी अर्ज केला आहे आणि ज्या लाभार्थी झालेल्या होत्या, अशा महिलांकडे चारचाकी वाहन आहे की नाही? याची तपासणी केली जात आहे. तसेच ज्या महिला निकषात बसत नाहीत, त्यांनी स्वत:हून अर्ज मागे घेण्याचं आवाहन सरकारने आधीच केलेलं आहे.
लाडकी बहीणच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात 7 हप्त्याचे पैसे जमा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे राज्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात आतापर्यंत सात हप्त्यांची रक्कम जमा झाली आहे. म्हणजेच एका महिलेला 1500 रुपयांप्रमाणं 10500 रुपये मिळाले आहेत. जानेवारी महिन्यात साधारणपणे 2 कोटी 41 लाख महिलांना सातव्या हप्त्याची रक्कम मिळाली आहे दरम्यान, ज्या महिलेच्या नावावर किंवा तिच्या कुटुंबात चार चाकी वाहन असेल त्या महिला या योजनेस पात्र ठरणार नाहीत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community