Shrikant Shinde : महाराष्ट्र राज्य इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांच्या उभारणीत देशात अग्रस्थानी आहे – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणारा प्रकल्प ठरला आहे.

164
आगामी Assembly Election ची जोरदार तयारी : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मुंबईच्या बांधणीसाठी रस्त्यावर

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नारेडेको) महाराष्ट्र यांच्या वतीने मुंबई येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला शनिवार, १६ सप्टेंबर रोजी उपस्थित राहून राज्यात तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील अर्थातच एमएमआर रिजन मध्ये सरकारच्या वतीने सुरू असलेल्या विविध विकासकामांबाबत उपस्थितांशी संवाद साधला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यात इन्फ्रास्ट्रक्चर संबंधित अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प उभे राहत आहेत तर बहुतांश प्रकल्प मार्गी लागले आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्य इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांच्या उभारणीत देशात अग्रस्थानी आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणारा प्रकल्प ठरला आहे. याच बरोबर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, द मिसिंग लिंक-लोणावळा यांसह एमएमआरमधील मेट्रो प्रकल्प, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन यांसारखे अनेक प्रकल्प उभे राहत आहेत, असे यावेळी सांगितले. राज्याच्या विकासात स्थानिक विकासकही महत्वाची भूमिका बजावत असतात. यामुळे रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर यांचा एकत्रित रित्या विकास होणे गरजेचे आहे. यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करायला हवे, असेही यावेळी सांगितले.

(हेही वाचा – Ganesh Festival : शासनाकडून सर्वोत्कृष्ट मूर्ती आणि सजावट स्पर्धेचे आयोजन; जाणून घ्या काय आहेत निकष…)

यावेळी एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी, महारेराचे अध्यक्ष अजोय मेहता यांच्यासह नारेडेकोचे अनेक सन्मानिय सदस्य उपस्थित होते. याच बरोबर माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातही गेल्या काही वर्षात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प उभे राहिले आहेत. ऐरोली-काटई नाका फ्री वे आणि माणकोली-मोठागाव पूल, मतदारसंघात रस्त्यांची उभारणी यांसह पायाभूत सुविधांची अनेक प्रकल्प आज मतदारसंघातील अनेक शहरांमध्ये उभे राहिले आहेत.

यामुळे या शहरांचे रूप पालटले आहे. कोणत्याही शहराच्या विकासात तेथील रिअल इस्टेट क्षेत्र अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते, असेही यावेळी आवर्जून सांगितले. यामुळे येणाऱ्या काळात विकासासाठी सर्वांनी एकत्र येत काम करायला हवे असे मत यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या शेवटी प्रसिध्द प्रेरणादायी वक्ते गौर गोपाल दास यांनी उपस्थितांशी त्यांच्या अनोख्या शैलीत संवाद साधत तणावमुक्त आयुष्याचा मूलमंत्र दिला. या सत्रातून एक सकारात्मक ऊर्जा मिळाली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.