
काळाची गरज ओळखून रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून जगभरात भारतीय कुशल मनुष्यबळ पुरवत आहे, ही आनंदाची बाब आहे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांनी केले. रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या समारोप कार्यक्रमात राज्यपाल राधाकृष्णन विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.
एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल येथे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा दुसऱ्या वर्धापन दिनाचा समारोप कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) होते. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या वर्धापन दीन समारोपात कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा, महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. टी. जी. सिताराम, राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख, कौशल्य विभाग आयुक्त नितीन पाटील उपस्थित होते.
(हेही वाचा – Paneer Adulteration : पनीर ऐवजी चीज ॲनालॉग वापरल्यास मेनू कार्डवर उल्लेख बंधनकारक)
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) पुढे म्हणाले की, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने AI तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वाणिज्य आणि मीडिया या क्षेत्रात कौशल्य शिक्षण आणि प्रशिक्षणाचा प्रारंभ केला आहे, हे अतिशय आनंददायक आणि उल्लेखनीय आहे. बदलत्या काळात आपल्या पारंपरिक कौशल्याच्या पलीकडे जाऊन आपण नवी पिढी घडवली पाहिजे, त्यासाठी आपल्या शिक्षकांनीही नवी संकल्पना समजून घेऊन त्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवे. रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विभागाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर या दृष्टिकोनातून योगदान देत असल्याबाबत त्यांचेही अभिनंदन करतो असेही, राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी नमूद केले.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला ‘विकसित राष्ट्र’ निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. विकसित राष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांनी सुरू केलेला ‘स्किल इंडिया’ हा उपक्रम या संकल्पात महत्वाचा भाग आहे. जागतिक कौशल्य आत्मसात करताना परदेशी भाषा शिक्षण अतिशय महत्वाचे आहे. राज्याच्या कौशल्य विभागाने जर्मन भाषा विद्यार्थ्यांना शिकवून मनुष्यबळ पुरवण्याचा अतिशय योग्य निर्णय घेतला असल्याचेही राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी एखादी तरी जागतिक भाषा शिकावी, असे आवाहनही यावेळी राज्यपालांनी केले. जगात आवश्यक असलेले मनुष्यबळ पुरवण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात मोठा वाव असल्याचेही ते म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community