राज्यात दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने, राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा 75 टक्के अभ्यासक्रमांकावर घेतल्या, तर प्रात्यक्षिकांसाठी 40 टक्के अभ्यासक्रम होता. तसेच पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती, मात्र 2022-2023 या शैक्षणिक वर्षांत पहिली ते बारवीच्या सर्व परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर होणार असून, यादृष्टीने विद्यार्थ्यांनी तयारी करावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. त्यासंदर्भात शासन निर्णयही जाहीर झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मागील 2 वर्षे शाळा सुरु नव्हत्या. या काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने शिक्षण झाले, मात्र अपु-या इंटरनेट सुविधांमुळे शिक्षणाला मर्यादा येत होत्या. त्यामुळे इयत्ता 10 ते 12 वीच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती.
( हेही वाचा मुलीच्या नावे जमा होणार ५० हजार रुपये! जाणून घेऊया ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेविषयी…)
अभ्यासक्रम पूर्ववत केले जाणार
यंदाचे शैक्षणिक वर्ष हे वेळेवर सुरु झाले असून, विद्यार्थ्यांच्या शाळा या नियमित पद्धताने, पूर्ण वेळ सुरु आहेत. विदर्भातील शाळाही येत्या 27 जूनपासून सुरु होणार असल्याने, अभ्यासक्रम पूर्ववत म्हणजे 100 टक्के करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community