The Tariff War : ट्रम्प यांनी पुकारलेल्या व्यापारी युद्धामुळे वस्तूंच्या किमतीवर नेमका काय परिणाम होणार? कुठल्या वस्तू महाग होणार?

The Tariff War : ट्रम्प यांनी सध्या मेक्सिको, चीन आणि कॅनडातून आयात होणाऱ्या वस्तूंवरील शुल्क वाढवलं आहे.

71
The Tariff War : ट्रम्प यांनी पुकारलेल्या व्यापारी युद्धामुळे वस्तूंच्या किमतीवर नेमका काय परिणाम होणार? कुठल्या वस्तू महाग होणार?
  • ऋजुता लुकतुके

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात व्यापारी युद्धाचा दुसरा अध्याय सुरू केला आहे. आणि यावेळी अगदी सुरुवातीच्या दिवसांतच त्यांनी कॅनडा, चीन आणि मेक्सिकोला दणका दिला आहे. अमेरिकन वस्तू त्या देशात निर्यात झाल्यावर त्यांच्यावर बसणाऱ्या आयात शुल्काइतकं शुल्क या देशातून अमेरिकेत आयात होणाऱ्या मालावरही बसवायचं असं ट्रम्प यांचं धोरण आहे. गेल्या खेपेच्या तुलनेत ते अधिक आक्रमकपणे हे धोरण राबवत असल्याचं सुरुवातीच्या दिवसांत दिसत आहे. त्यामुळे खुद्ध अमेरिकेसह इतर देशांमध्येही वस्तू आणि सेवांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

वस्तू आणि सेवांचे दर किती प्रमाणात वाढतील हे देशातील चलन स्थिरता, आयात शुल्क वाढलेल्या वस्तूंचे पर्याय आणि वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणारी यंत्रणा किती सक्षम आहे यावर अवलंबून असेल असं रॉयटर्स वृत्तसंस्थेनं एका बातमीत म्हटलं आहे. (The Tariff War)

(हेही वाचा – Budget Session 2025 : वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीती, साखळी कुंपणासाठी २०० कोटींचा निधी मंजूर)

हे विस्ताराने समजून घेऊया,

बाजारात वस्तू किंवा सेवेला असलेला पर्याय : अमेरिकेनं एखाद्या वस्तूवरील आयात शुल्क वाढवलं तर अशा वस्तूची भारतातून होणारी निर्यात कमी होईल. ही वस्तू भारतातच जास्त प्रमाणात उपलब्ध होईल. अमेरिकेत मात्र या वस्तू आणि सेवेसाठी इतर देशांतूनही आवक होत असेल तर विशिष्ट देशातून होणारी आयात महाग झाली तरी वस्तूचे दर आटोक्यात राहतील. नाहीतर ते वाढत जातील. कपडे, कारचे सुटे भाग, तयार कापड, कॉस्मेटिक्स यांचा या सदरात समावेश होतो.

लक्झरी उत्पादनांच्या किमती वाढणार : अमेरिकेत लक्झरी उत्पादनांच्या किमती यामुळे वाढू शकतील. उंची वस्तू आणि सेवा ही लोकांची पसंती असते. उदा. इटालियन वाईनवर आयात शुल्क वाढलं तरी या वाईनचे चाहते आपला ब्रँड बदलणार नाहीत. त्यामुळे अशा वस्तूंमध्ये दरवाढ अटळ आहे. उलट स्थानिक ब्रँडही या दरवाढीचा फायदा घेऊन आपले भाव वाढवू शकतात. मद्य, फॅशन अशा वस्तूंचा यात समावेश होतो. (The Tariff War)

(हेही वाचा – Budget Session 2025 : …त्यामुळे पंडित नेहरूंचाही निषेध झाला पाहिजे; फडणवीसांचे विरोधकांना आव्हान)

इलेक्ट्रनिक वस्तू महागणार : इलेक्ट्रॉनिक वस्तू मात्र निश्चित महाग होणार आहेत. भारत किंवा अमेरिकेतही या वस्तू थेट बनत नाहीत. अजूनही चीन हे या वस्तूंसाठी महत्त्वाचं उत्पादन केंद्र आहे. अशा वस्तूंवरील आयात शुल्क १० टक्क्यांनी वाढलंय म्हटल्यावर अमेरिकन तसंच भारतीयांनाही इथून पुढे ॲपल फोन, मॅकबुक, सोनी, गेमिंग कन्सोल अशा इलेक्ट्रनिक वस्तू महाग मिळू लागतील.

वाहन उद्योग, घरगुती उपकरणं महागणार : वाहनाचे सुटे भाग, घरगुती उपकरणं बनवण्यातही चीनची मक्तेदारी आहे. यंत्राचे सुटे भागही मोठ्या प्रमाणात इथं बनतात. त्यामुळे कुठल्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांची किंमत येणाऱ्या दिवसांत वाढणार आहे. जगभर याचे पडसाद उमटणार आहेत. (The Tariff War)

अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम : वस्तू आणि सेवांच्या किमती वाढणार म्हणजेच देशात महागाई वाढणार. अमेरिकेबरोबर भारताला याचा फटका बसू शकतो. पण, दुसरीकडे भारताचा फायदाही यात आहे. अमेरिका चिनी उत्पादनांवरील आयात शुल्क वाढवणार आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या वस्तू चीन बनवत होता त्या वस्तू आता भारताकडून खरेदी करण्यासाठी अमेरिका उत्सुक असेल. टेस्ला, ॲपल यांचे उत्पादन कारखाने भारतात सुरूही होत आहेत. पण, येणाऱ्या काळात चीन आणि कॅनडासारखी परिस्थिती भारतावरही उद्भवू शकते. कारण, ट्रम्प यांनी भारतालाही शुल्क वाढीचा इशारा दिला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.