तिसरी लाट लवकर आली आणि आता औषध साठ्याची बोंबाबोंब झाली…

फेब्रुवारी महिन्यात अपेक्षित असलेल्या तिस-या लाटेने डिसेंबर अखेरिसच आगमन केल्याने आता रुग्णसंख्या दर दिवसाला नवा रॅकोर्ड करत आहे. परिणामी रुग्णांसाठी आवश्यक औषधांचा साठा बाजारात उपलब्ध करताना आता फार्मासिस्टची दमछाक होऊ लागली आहे. यात प्रामुख्याने कोरोना काळापासून प्रामुख्याने वापरल्या जाणा-या एव्हरमॅक्सिन या औषधासाठी फार्मासिस्टची दाणादाण उडाली आहे. मुंबई व नजीकच्या ठाणे, पालघर व नवी मुंबईत वाढत्या रुग्णसंख्येचा भार आता औषधांच्या तुटवडा दर्शवत आहे.

एव्हरमॅक्सिन औषध रामबाण 

रुग्णसंख्या वाढणार असल्याची पूर्वकल्पना असली तरीही नेमक्या औषधांचा साठा यात सरकार आणि फार्मासिस्ट दोघांचीही गफलत झाल्याने मंगळवारपासून कोरोनाच्या उपचारांसाठी आवश्यक औषधांची मागणी वाढू लागली. गेल्या दोन महिन्यांत एव्हरमॅक्सिन हे औषध मुळात बाजारात फारसे येत नव्हते. कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेत हे औषध प्रामुख्याने वापरले गेले होते. एव्हरमॅक्सिन हे प्रामुख्याने माणसाच्या शरीरातील पोटातील किडे मारण्यासाठी वापरले जाते. परंतु व्हायरल फिव्हरवरही हे औषध रामबाण उपाय ठरल्याने कोरोना उपचारांसाठी सरकारने तयार केलेल्या औषधांच्या कृती आराखड्यामध्ये या औषधाचा समावेश केला गेला. दुसरी लाट ओसरताच गेल्या दोन महिन्यांत एव्हरमॅक्सिन औषध बाजारातील साठा फारच कमी ठेवला गेला. मात्र यंदाच्या आठवड्यापासून या औषधांची मागणी वाढल्याने मुंबई व महानगर परिसरातील फार्मासिस्टची त्रेधातिरपट उडाली आहे.

सरकारने तिस-या लाटेच्या आगमनापूर्वी औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवा, अशी सूचना केली होती. मात्र तिस-या लाटेचे आगमन लवकर झाले. त्यात नेमकी औषधांची मागणी समजण्याअगोदरच रुग्णसंख्या वाढत गेली. पूर्वकल्पनेत नेमकी औषधांची संख्या समजणे आवश्यक आहे. सरकारी पातळीवरही आवश्यक औषधांची संख्या आम्हाला कळवली गेली नाही. आता फार्मासिस्टने रोजच्यापेक्षाही जवळपास दोनशे टक्के अतिरिक्त साठ्याची मागणी औषधनिर्मात्या कंपन्यांना केली आहे. हा साठा लवकरच मुंबई व महानगर परिसरातील प्रत्येक फार्मासिस्टकडे उपलब्ध होईल.
– अभय पांडे, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल फूड एण्ड ड्रग लायसन्स हॉल्डर्स फाऊंडेशन

(हेही वाचा आशिष शेलारांना धमकी देणारा निघाला ‘ओसामा’)

या औषधांसाठी ही सुरु वणवण

अर्जिथोमायसीन –

कोरोना झाल्यास घशाला खवखव होत असल्याची रुग्णाची तक्रार असते. मात्र या औषधाच्या सेवनाने घशाची खवखव वाढत नाही.

एमॉक्सिसिलिन व काल्वेनॅक्स –

घसा आणि फुफ्फुसाला कोरोनाचा विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर संसर्गाची बाधा देतो. या एन्टीबायोटीक औषधाच्या एकत्र सेवनाने संसर्ग नियंत्रणात राहण्यास मदत होते.

नॉझल स्प्रे –

कोरोनाच्या प्राथमिक लक्षणात सर्दीचा फारच त्रास असल्यास त्वरित नॉझल स्प्रे वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे जाम झालेल्या नाकातील सर्दी वाहू लागते. सुकी सर्दी ही कोरोना शरीरात शिरण्यास अनुकूल ठरते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here