ओमायक्रॉन विषाणूमुळे वेळेअगोदरच आगमन झालेल्या, कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारी महिन्याच्या पंधरवड्यापर्यंतच राज्यात दिसून येईल. येत्या पंधरा दिवसांतच रुग्णसंख्या आता हळूहळू कमी होईल, अशी माहिती आरोग्य विभागाचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
रुग्णसंख्या कमी होतेय
सोमवारी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी राज्यातील कोरोना बाधितांच्या नव्या नोंदीत केवळ १५ हजार १४० रुग्ण आढळले, तर रविवारी २२ हजार ४४४ कोरोनाचे रुग्ण आढळले. दोन आठवड्यांपूर्वी मुंबईतील कोरोनाची संख्या नियंत्रणात आल्यानंतर, गेल्या आठवड्यात पुण्यातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. एका दिवसांत सात हजारांनी रुग्णसंख्या कमी होत सोमवारची पुण्यातील सक्रीय रुग्णांची संख्या आता ६२ हजार ३६५ वर पोहोचली आहे.
( हेही वाचा: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला कारणीभूत ‘हिंदुस्थान भाऊ’ला अटक! )
मुंबई दहा हजांराच्याखाली
रविवारी मुंबईत १० हजार ७१७ रुग्णांवर उपचार सुरु होते. आता मुंबईत केवळ ९ हजार ९९० कोरोनाचे रुग्ण उरल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मुंबईत दर दिवसाला हजारांच्या संख्येने किमान नवी रुग्ण संख्या आढळून यायची. सोमवारी नव्या रुग्णांच्या यादीत केवळ ९६० रुग्णांची नोंद मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केली.
Join Our WhatsApp Community