पाच जंबो कोविड सेंटरचा तीन महिन्यांचा व्यवस्थापन खर्च १०० कोटी

तिसरी लाट उद्भवल्यास प्रशासनाला तात्काळ मदत उपलब्ध व्हावी यासाठी ही तयारी करुन ठेवली असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

मुंबईत कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे महापालिका प्रशासन बोलत असले, तरी प्रत्यक्षात संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज आहे. त्यामुळे तिसरी लाट आलीच तर रुग्णांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून जंबो कोविड सेंटरमध्ये आयसीयू, ऑक्सिजन बेड्स, पेडियाट्रीक आयसीयू, डायलिसीस आयसीयू सेवांसाठी खासगी रुग्णालयांची मदत घेतली जात आहे. पुढील तीन महिन्यांसाठी खासगी रुग्णालय व वैद्यकीय संस्थांची यासाठी नेमणूक करुन प्रत्येक बेडसाठी महापालिका पैसे मोजणार आहे.

(हेही वाचाः मुंबईतील जंबो कोविड सेंटरमधल्या ऑक्सिजन प्लांटचा खर्च झाला कमी)

यांची झाली निवड

कोविड-१९च्या संभाव्य तिस-या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्याने, महापालिकेच्या बीकेसी, दहिसर, सोमय्या मैदान, कांजूरमार्ग व मालाड या पाच जंबो कोविड केंद्रांतील वैद्यकीय सेवांचे प्रचलन व व्यवस्थापन खासगी वैद्यकीय संस्थेमार्फत करण्यासाठी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने स्वारस्याचे देकार मागवले होते. यामध्ये १३ देकार प्राप्त झाले. त्यातील रुबी ऑलकेअर सर्विसेस, लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस, ओम साई आरोग्य केअर प्रायव्हेट लिमिटेड आणि मुलुंड ऍपेक्स हॉस्पिटल यांचे प्रति खाट दर कमी आढळल्याने त्यांची निवड करण्यात आली आहे.

(हेही वाचाः आता जंबो कोविड सेंटरमध्येही ७१ ऑक्सिजन निर्मिती प्लांट!)

आरोग्य व्यवस्थापनाची तयारी

या पाचही जंबो कोविड सेंटरमध्ये अतिदक्षता, ऑक्सिजन आणि विना ऑक्सिजन बेड्सचे तीन महिने अथवा कोविड- १९च्या प्रादुर्भाव कमी होईपर्यंत, यापैकी जो कालावधी कमी असेल त्या कालावधीत व्यवस्थापन राखण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पाच केंद्रांच्या व्यवस्थापनासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र, कोणत्याही वैद्यकीय संस्थांना कार्यादेश देण्यात आलेले नसून, तिसरी लाट उद्भवल्यास प्रशासनाला तात्काळ मदत उपलब्ध व्हावी यासाठी ही तयारी करुन ठेवली असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

(हेही वाचाः जंबो कोविड सेंटरसाठी २० कोटींच्या औषधांची खरेदी)

बीकेसी जंबो कोविड सेंटर

आयसीयू बेड : १०८

नियुक्त वैद्यकीय संस्थेचे नाव : ओम साई आरोग्य केअर प्रायव्हेट लिमिटेड

तीन महिन्यांकरता होणार खर्च : ५ कोटी ६३ लाख ६६ हजार २८० रुपये

दहिसर जंबो कोविड सेंटर

आयसीयू बेड : १००

ऑक्सिजनेटेड : ६१३

नॉन ऑक्सिजनेटेड : ११७

नियुक्त वैद्यकीय संस्थेचे नाव : लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस

तीन महिन्यांकरता होणार खर्च : १४कोटी ०५ लाख ०३ हजार ६८० रुपये

(हेही वाचाः दहिसर जंबो कोविड सेंटरच्या ऑक्सिजन पुरवठ्याला येणार बळकटी!)

सोमय्या मैदान जंबो कोविड सेंटर

आयसीयू बेड : २००

ऑक्सिजनेटेड : ७५०

पेडियाटीक आयसीयू : ५०

पेडियाटीक : १००

नियुक्त वैद्यकीय संस्थेचे नाव : ऍपेक्स हॉस्पिटल,मुलुंड

तीन महिन्यांकरता होणार खर्च : २२ कोटी ४७ लाख ७५ हजार ००० रुपये

कांजूरमार्ग जंबो कोविड सेंटर

आयसीयू बेड : १५०

ऑक्सिजनेटेड : १२००

नॉन ऑक्सिजटेड : ३००

पेड्रीयाटीक आयसीयू : ५०

नियुक्त वैद्यकीय संस्थेचे नाव : मेडटायटन्स मॅनेजमेंट

तीन महिन्यांकरता होणार खर्च : २८ कोटी २३ लाख ३९ हजार ००० रुपये

(हेही वाचाः जंबो कोविड सेंटरचे कंत्राट मर्जीतील कंत्राटदारांना देण्याचा घाट! भाजपचा आरोप)

मालाड जंबो कोविड सेंटर

आयसीयू बेड : १९०

ऑक्सिजनेटेड : १५३६

नॉन ऑक्सिजटेड : ३८४

डायलिसीस आयसीयू : २०

ट्राएज (आयसीयू) : ४०

नियुक्त वैद्यकीय संस्थेचे नाव : रुबी ऍलकेअर सर्विसेस

तीन महिन्यांकरता होणार खर्च : ३४ कोटी ५१ लाख ८७ हजार २६० रुपये

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here