राज्यात कोरोना रुग्णांची आता १४ हजारांवरुन आता १३ हजारांच्या घरात आली आहे. मंगळवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आता १३ हजार ९४३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
( हेही वाचा : हिंगोलीत होणार बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र )
पुण्यात रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र दिसून येत असताना आता नाशिक जिल्ह्यांतही आता रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. मंगळवारपर्यंत नाशिक जिल्ह्यांत ६३४ कोरोना रुग्ण होते. बुधवारी रुग्णसंख्येत घट आढळली. आता नाशिक जिल्ह्यात ५८१ कोरोना रुग्णांना उपचार दिले जात आहेत. नाशिकपाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यांतही रुग्ण घटल्याने आता रुग्णांची संख्या पाचशेच्या खाली येत ४८५ वर आली आहे. या दोन जिल्ह्यांतील रुग्णसंख्या सातत्याने वाढत होती. ठाण्यातील रुग्णसंख्याही आता ८४७ वर उरल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. नव्या कोरोना रुग्णांच्या नोंदीत बुधवारी २ हजार १३८ कोरोना रुग्ण आढळले. गेल्या २४ तासांत २ हजार २७९ रुग्णांना कोरोनातील यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज दिला गेला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९८ टक्क्यांवर कायम आहे.
८ कोरोनाबाधितांचा मृत्यू
मुंबई, पिंपरी-चिंचवड, साताारा, कोल्हापूर, बुलडाणा येथे मिळून ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. एकट्या सातारा जिल्ह्यांत ३ जणांचा मृत्यू झाला तर मुंबईत २ कोरोनाबाधितांनी उपचारादरम्यान आपले प्राण गमावले.