भारतातील रेल्वे सेवा ही अगदी इंग्रजांच्या काळापासून सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून अनेक निर्णय घेण्यात येतात. पण रेल्वेने आता पूर्वापार चालत आलेली परंपरा मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालय आणि देशभरातील रेल्वे जीएम ऑफिसमध्ये तैनात असणा-या आरपीएफ जवानांचे सलाम ठाकणे बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केला आहे.
ही पद्धत केली बंद
इंग्रजांच्या काळापासून भारतीय रेल्वेमध्ये ही सलाम ठोकण्याची परंपरा सुरू आहे. रेल्वे मंत्रालयामध्ये आणि बोर्डाच्या सदस्यांसाठी असलेल्या विविध प्रवेशद्वारांवर आरपीएफचे हे जवान तैनात असतात. रेल्वेच्या सर्व विभागीय कार्यालयांमध्ये सुद्धा हीच पद्धत लागू करण्यात आली होती. ही पद्धत गेल्या काही दिवसांपासून तत्काळ प्रभावाने संपुष्टात आणण्यात आली आहे.
(हेही वाचाः ‘या’ उमेदवारांना परीक्षेविना मिळणार रेल्वेत नोकरी, पटापट भरा अर्ज)
रेल्वे मंत्र्यांचे निर्देश
इंग्रजांपासून सुरू असलेली ही प्रथा हे सामंतशाहीचं प्रतीक आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आपल्यासाठी ठोकण्यात येणा-या या सलामांची तुलना आपल्या प्रतिष्ठेशी करतात. त्यामुळे ही प्रथाच बंद करण्याचे आदेश रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत.
Join Our WhatsApp Community