भारतीय रेल्वेतून दररोज करोडो लोक प्रवास करतात. अशा स्थितीत रेल्वे हा भारतातील सर्वसामान्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. रेल्वे वेळोवेळी प्रवाशांसाठी नवनवीन सुविधांच्या घोषणा करत असते. आता ट्रेनमधून प्रवास करताना, तुमचं स्टेशन आल्यावर रेल्वे तुम्हाला ‘वेकअप काॅल’ करणार आहे. त्यामुळे तुमचे स्टेशन चुकणार नाही.
डेस्टिनेशन अलर्टद्वारे, प्रवाशांना स्थानकावर पोहोचण्यापूर्वी रेल्वे काॅल करेल. यानंतर प्रवासी वेळेपूर्वी उठेल आणि त्याच्या स्थानकावर उतरण्याची सर्व तयारी करेल. हा काॅल प्राप्त करण्यासाठी, तुम्हाला IRCTC च्या 139 क्रमांकावर काॅल करावा लागेल. त्यानंतरच तुम्हाला रेल्वे वेकअप काॅल करेल.
( हेही वाचा: Indian bank SO Recruitment 2022 : इंडियन बॅंकेत 300 हून अधिक पदांची भरती; असा करा अर्ज )
सुविधेसाठी भरावे लागणार शुल्क
डेस्टिनेशन अलर्ट मिळवण्यासाठी तुम्हाला शुल्क भरावी लागेल. हे शुल्क प्रति एसएमएस शुल्क 3 रुपये असेल. रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत हा संदेश मिळेल.
Join Our WhatsApp Community