हवेची गुणवत्ता सुधारण्याचे काम हे माणुसकीचे! केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांचे प्रतिपादन

हवेची गुणवत्ता सुधारण्याचे काम स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांच्या संयुक्त विद्यमाने व्हायला हवे. संबंधित संस्थांचे प्रशासकीय अधिकारी तसेच सामाजिक सेवा संस्थांचे अधिकारी आदींसोबत एकत्रितपणे येऊन हवेची गुणवत्ता सुधारायला हवी, हे काम माणुसकीचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वने तसेच हवामानबदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी ्व्यक्त केले.

मंगळवारी राष्ट्रीय स्वच्छ वायू जागरुकता कार्यक्रम जागरुकता आणि आढावा या विषयावर पश्चिम विभागाच्या कार्यशाळेमध्ये बोलताना यादव यांनी आपली मते मांडताना वायू प्रदूषणाविरोधात लढा देताना सर्व घटकांना एकत्र येण्याचा सल्ला दिला. यावेळी पर्यावरण मंत्रालयाबाबत समाजमनात असलेल्या समजुतींबाबतही त्यांनी भाष्य केले. पर्यावरण मंत्रालय हे केवळ मंजुरी देणारे मंत्रालय नसून सामाजिक बांधिलकी्च्या नात्याने समाजाला एकत्र बांधण्यासाठी उपाय शोधणारे महत्त्वाचे मंत्रालय असल्याचेही ते म्हणाले. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांसह पर्यावरण विभागातील इतर अधिकारीही उपस्थित होते.

नुकतेच स्कॉटलंट येथे पार पडलेल्या हवामान विषयक दोन आठवड्यांच्या परिषदेला केंद्रीय वने, पर्यावरण आणि हवामानबदल मंत्री भूपेंद्र यादव तसेच राज्याचे पर्यावरणंमंत्री आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती. त्या परिषदेतील चर्चाही यादव यांनी या कार्यक्रमात मांडल्या. गुजरातचे पर्यावरणमंत्रीही यावेळी हजर होते.

(हेही वाचा …अन् साप झाला टल्ली!)

काय म्हणाले मंत्री भूपेंद्र यादव?

  • गेल्या २०० वर्षांत ज्या स्त्रोतांद्वारे उर्जानिर्मिती झाली. त्यामुळे आता पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत आहेत. या पद्धतीने ऊर्जानिर्मिती कायम राहिली तर पृथ्वीचे तापमान २ अंशाने वाढण्याची भीती आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होत आहे.
  • अवकाळी पाऊस, निसर्गाचा प्रकोप, ढगफुटी, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ अशा आपत्तींमधून आपल्याला धोक्याचा इशारा मिळतोय.
  • पॅरिस परिषदेच्यावेळी आपल्या देशाने अपारंपरिक स्त्रोतांद्वारे उर्जानिर्मितीचे उद्दिष्ट ४० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे ठरवले. त्यानुसारच आपण कार्बन उत्सर्जन कमी केले. त्यामुळेच आपला देश जगभरात पर्यावरणविषयक उद्दिष्ट साध्य करणारा देश म्हणून ओळखला जातोय.
  • पॅरिस परिषदेत विकसनशील देशांना जाहीर केलेली आर्थिक मदत अद्यापही मिळालेली नाही.
  • कॉप २६ परिषदेत आपल्या देशाने तीन महत्त्वाच्या विषयांसदर्भात जगासोबत भागीदारी केली. आपण युके, ऑस्ट्रेलिया या देशांसह लहान द्वीपराष्ट्रांसाठी १० दशलक्ष डॉलर योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • महाराष्ट्रातील ‘माझी वसुंधरा’ या उपक्रमाचेही मंत्री भूपेंद्र यादव यांनी कौतुक केले.

काय म्हणाले मंत्री आदित्य ठाकरे?

स्वच्छ हवेसाठी मुंबईत विजेवर चालणा-या बसेस आल्या आहेत. २०२३ पर्यंत अर्ध्याहून अधिक बसेस विजेवरच चालणा-या असतील. २०२७ पर्यंत संपूर्ण बसेसचा ताफाच विजेवर चालणा-या बसेसचा असेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here