…तर तुमची कोरोना चाचणी केली जाणार नाही!

कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्राने राज्यांना पत्र पाठवून काही नियम आखून दिले होते. या नियमावलीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून वेळोवेळी बदल केले जात आहेत. आता केंद्राने रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्याबाबतच्या नियमात बदल केला आहे. अगदी सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना सलग तिस-या दिवशी ताप आला नाही, तर त्यांना घरी सोडताना त्यांची पुन्हा कोरोना चाचणी केली नाही तरी चालणार आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे.

हा चिंतेचा विषय

ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत त्या रुग्णांना सात दिवसात घरी सोडण्याची मुभा केंद्राने दिली आहे. तसेच, मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढले तर त्यांनादेखील रुग्णालयातून घरी पाठवण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये संक्रमण जास्त आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.

( हेही वाचा :बर्गर विकणारा ‘असा’ झाला मालामाल! )

इतरांचे जीव धोक्यात आणू नका

ओमायक्राॅन हा अत्यंत वेगाने पसरणारा असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटना वारंवार देत आहे. त्यामुळे देशात प्रत्येकाने आरोग्य नियमांचे अत्यंत काटेकोर पालन करावे. मास्क न लावणे व सुरक्षित अंतर पाळणे याबाबत बेपर्वाईने वागून इतरांचे जीव धोक्यात आणू नयेत, असे  आवाहन संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here