विक्रोळी पश्चिम येथील एलबीएस मार्गाजवळील २४ इंच व्यासाची जलवाहिनीला शनिवारी गळती लागल्याने यातून मोठ्याप्रमाणात पाणी वाहून गेले. त्यामुळे या जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून हे काम युध्दपातळीवर सुरु आहे. या दुरुस्तीच्या कामांमुळे भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला आदी पश्चिम भागातील एलबीएस रोड लगतच्या परिसरांतील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या एस विभागांतर्गत येणाऱ्या विक्रोळी पश्चिम येथील लालबहादूर शास्त्री मार्गालगत असलेल्या २४ इंच व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागल्याने यातून मोठ्याप्रमाणात पाणी वाहून जात होते. ही जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याने तातडीने या जलवाहिनी दुरुस्तीचे काम सहायक अभियंता (देखभाल) यांच्यामार्फत हाती घेण्यात आले. या पथकाच्या माध्यमातून हे काम हाती घेतल्याने ही जलविहनी तात्पुरती बंद करण्यात आली.
(हेही वाचा – Rahul Gandhi : मंदिरातील मूर्तींप्रमाणे शक्तीहीन आहेत संसदेतील खासदार; राहुल गांधींनी दुखावल्या हिंदूंच्या धार्मिक भावना)
या दुरुस्तीच्या काळात एस विभागातील भांडुप विक्रोळी, एन विभागातील घाटकोपर आणि विद्याविहार आणि एल विभागातील कुर्ला आदी पश्चिम दिशेला असणाऱ्या भागात विशेषत: एलबीएस मार्गालगतच्या वस्त्यांमधील पाणी पुरवठ्यांमध्ये परिणाम होण्याची शक्यता महापालिका जल अभियंता विभागाने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community