काल म्हणजेच गुरुवार २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता वाजत गाजत निघालेल्या (Lalbaugcha Raja Visarjan 2023) लालबागच्या राजाचं तब्बल २२ तासांनी विसर्जन झालं आहे. आज (शुक्रवार, २९ सप्टेंबर) सकाळी ९:१५ वाजेच्या सुमारास बाप्पाचं विसर्जन झालं आहे.
संपूर्ण देशाचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाने (Lalbaugcha Raja Visarjan 2023) मागील दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर आता भक्तांचा निरोप घेतला आहे. सकाळी नऊ वाजेनंतर लालबागचा राजा गिरगावच्या समुद्रात विसर्जित झाला. राजाला निरोप देण्यासाठी यावेळी भाविकांची तोबा गर्दी होती. पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आश्वासन देऊन बाप्पाने आपल्या लाडक्या भाविकांचा निरोप घेतला आहे.
(हेही वाचा – Visarjan 2023 : ‘या’ कारणामुळे लालबागसह अनेक मोठ्या मूर्तींचे विसर्जन रखडले)
कोळी बांधवांकडून राजाला सलामी
दरवर्षीप्रमाणे कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाला (Lalbaugcha Raja Visarjan 2023) बोटींची सलामी देण्यात आली. समुद्रात मध्यभागी लालबागचा राजा असलेला तराफा आणि आजूबाजूला कोळी बांधवांच्या बोटी पाहायला मिळाल्या. चौपाटीपासून काही अंतरावर आत समुद्रात जात लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त (Lalbaugcha Raja Visarjan 2023) पाहायला मिळाला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community