Water Supply : मुंबईकरांना होणाऱ्या धरणातील पाणीसाठा मागील वर्षांपेक्षा अधिक

152
Water Supply : जुलैच्या सुरुवातीला निम्म्यावर आलेला जलसाठा आता मागील दोन वर्षांच्या तुलनेत सर्वांधिक

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याच्या पातळीत आता चांगल्याप्रकारे वाढ होत असून सोमवारी या सर्व धरण आणि तलावांमध्ये तब्बल ३६.८६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मंगळवारी दिवसभरात जमा झालेला एकूण पाणीसाठा हा ५ लाख ३३ हजार ५२४ दशलक्ष लिटर एवढा झाला आहे. मागील काही दिवसांपासून गत वर्षीच्या पाणी साठ्याच्या तुलनेत यंदा निम्म्यावर आलेल्या हा पाणीसाठा आता झपाट्याने वाढू लागला असून आता हा साठा मागील वर्षाच्या एकूण साठ्याच्या अधिक जमा झाला आहे. (Water Supply)

(हेही वाचा – Harbhajan Apologizes : दिव्यांगांची नक्कल करणाऱ्या व्हिडिओवरून युवराज, हरभजन आणि रैनाविरुद्ध पोलीस तक्रार)

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरणांमधून मुंबईकरांना दिवसाला ३९०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर एवढा पाण्याचा साठा आवश्यक आहे. त्यातुलनेत यंदा ५ लाख ३३ हजार ५२४ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा १६ जुलै २०२४ पर्यंत जमा झाला आहे. तर मागील वर्षी याच कालावधीत ३२.५२ टक्के अर्थात ४ लाख ७० हजार ६२१ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा होता. तर त्या आधीच्या म्हणजे सन २०२२ मध्ये ७८.६३ टक्के अर्थात ११ लाख ३८ हजार ०९७ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा जमा झाला होता. तुळशी तलाव हा ८३ टक्के भरला असून तानसा ७२.५६ टक्के एवढा तलाव भरला आहे. तर विहार तलाव ५६ टक्के भरला आहे. मात्र, सर्वात जास्त पाण्याची मागणी पूर्ण करणारा ३५ टक्के, मोडक सागर ५७ टक्के, मध्य वैतरणा ३३ टक्के एवढा भरला आहे. (Water Supply)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.