‘या’ माश्याच्या ह्रदयाचं वजन आहे १८१ किलो

117

निसर्ग हा खरोखर खूप वेगळा आहे. निसर्ग चमत्कारिक आहे. निसर्ग जादुई आहे. ब्ल्यू व्हेल हा जगातला सर्वात मोठा मासा आहे. आता उद्योगपती हर्ष गोएंका यांनी सोशल मीडोयावर एक फोटो व्हायरल केल्यामुळे ब्ल्यू व्हेल माश्याची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे.

हर्ष गोएंका यांनी शेअर केलेल्या फोटोत ब्ल्यू व्हेल माश्याचे अवाढव्य ह्रदय दिसत आहे. नॅशनल वाइल्डलाइफ फेडरेशनच्या अहवालानुसारा व्ह्यू व्हेलची लांबी ११० फुट असू शकते आणि वजन सुमारे १५० टन असू शकते. आपल्याकडे म्हणतात ना, माणसाने मोठ्या मनाचं असावं. पण ब्ल्यू व्हेल माश्याचं ह्रदय खरोखरच मोठं आहे.

व्हेल माश्याच्या ह्रदयाचा फोटो इथे पाहा:

https://twitter.com/hvgoenka/status/1635296650603401217?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1635296650603401217%7Ctwgr%5Eae0d15db21fd8caac0f0bac248abfbbfc0f28e62%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fajab-gajab%2Fviral-blue-whale-heart-size-181-kg-heart-harsh-goenka-share-photo-5532617.html

गोएंका यांनी शेअर केलेल्या माश्याच्या ह्र्दयाचं वजन १८१ किलो असून ४.९ फुट लांबी आहे व ३.९ फुट रुंदी आहे. म्हणजे विचार करुन पाहा त्याचं ह्रदय किती मोठं असेल? हा फोटो खूप व्हायरल झाला. या फोटोवरुन आपल्याला हे कळते की खरोखरच निसर्गात बरेच काही दडलं आहे, जे अजूनही सर्वसामान्य माणसाला उमगलेलं नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.