भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (ISRO ‘चंद्रयान-३’चे विक्रम लँडर आज ४१ दिवसांचा अंतराळ प्रवास केल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (ISRO) ‘चंद्रयान-३’चे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संध्याकाळी ६वाजून ४ मिनिटांच्या ठोक्याला लॅण्ड होणार आहे. त्यानंतर चांद्रमोहीम यशस्वी करणाऱ्या चार देशांमध्ये भारताचं नाव गौरवानं घेतलं जाणार आहे. त्यासाठी इस्रोचे संशोधक सज्ज झाले असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश बनणार आहे.
भारताच्या अभिमानाची, स्वाभिमानाची आणि अत्यंत गौरवाची चंद्रयान-३ मोहीम… चांद्रयान-3 ची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. लँडर मॉड्युलसोबत अवकाशातून आणि जमिनीवरून अखंड संपर्काची तयारी पूर्ण झालीय. मात्र शेवटच्या १५ मिनिटांमुळे का वाढली धाकधुक वाढली आहे. शेवटचे १५ मिनिट म्हणजेच ९०० सेकंद ज्याच्यावर भारताचं मिशन चांद्रयान-3 चं यश अवलंबून आहे.
चंद्रयान-३ साठी शेवटचे पंधरा मिनिटं महत्वाची
२०१९ मध्ये चंद्रयान-२ यशाच्या जवळ होतं लॅण्डर मॉड्यूलने चंद्राच्या पृष्ठभागावर २.१ किमी उंची गाठली होती. किरकोळ तांत्रिक बिघाड झाला आणि लॅण्डर क्रॅश झालं. त्यामुळे चांद्रयान- ३साठी ते शेवटचे १५ मिनिटं महत्त्वाची मानली जातात. भारतीय वेळेनुसार २३ ऑगस्ट संध्याकाळी ६वाजून ४ मिनिटांनी चंद्रयान-३ चं लॅण्डर चंद्रावर लॅण्ड होईल पण त्या आधीचे १५ मिनिटं निर्णायक असतील कारण लॅण्डिंगची प्रक्रिया त्या शेवटच्या पंधरा मिनिटातच होणार आहे.
(हेही वाचा : Badminton World Championship 2023 : पी व्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत पराभव, लक्ष्य सेनची आगेकूच)
चंद्रयान-३ लॅण्डिंगचे चार टप्पे
- चंद्राच्या पृष्ठभागापासून लॅण्डरची उंची ८०० मीटर ते १३०० मीटर असेल
विक्रमचे सेन्सर्स कार्यान्वित होतील आणि त्याची उंची मोजली जाईल - पुढच्या १३१ सेकंदात लॅण्डर पृष्ठभागापासून १५०मीटरवर येईल
लॅण्डवरचा धोका शोधक कॅमेरा पृष्ठभागाच्या प्रतिमा कॅप्चर करेल - विक्रमवर बसवलेला धोका शोधणारा कॅमेरा रन करेल
प्रतिकूल परिस्थिती असेल तर विक्रम ७३सेकंदात चंद्रावर उतरेल
जर नो- गो अट असेल तर १५०मीटर पुढे जाऊन थांबेल - पुन्हा पृष्ठभाग तपासेल आणि सर्व ठीक असेल तर लॅण्ड होईल
यावेळी सर्वात मोठं आव्हान चंद्रयान-३ चा स्पीड कमी करण्याचं आहे. - लॅण्डरमध्ये लावण्यात आलेलं रॉकेट लॅण्डिंगचा स्पीड कंट्रोल करेल.चंद्रयान -२ च्या मोहीमेची पुनरावृत्ती नको म्हणून इस्त्रोने काळजी घेतली आहे.
- चंद्रयान-३ चंद्रावर पोहचण्यासाठीआता अवघे काही तास उरलेत जसा चंद्रयान-३ चा ४४ दिवसांचा प्रवास सुखरुप झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटली कनेक्ट राहणार
१५ व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे दाखल झाले. लँडिंग च्या थेट कार्यक्रमात ५. २० पासून नरेंद्र मोदी ही चंद्रयान-३ च्या लँडिंगदरम्यान डिजिटल माध्यमातून भारताशी संपर्कात राहतील.
मिशनच्या यशासाठी देशभरातील मंदिरांमध्ये पूजा पाठ
वाराणसीतील कामाख्या मंदिर,मुंबईतील चामुंडेश्वरी शिव मंदिर तसेच पुण्यातील दगडू शेठ गणपतीच्या मंदिरातही पूजा व अभिषेक करण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community