मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने (High Court) धक्कादायक निकाल दिला आहे. एका भ्रष्टाचारी सरकारी कर्मचाऱ्याचे निधन झाले तेव्हा पतीला भ्रष्टाचार करण्यापासून न रोखणे म्हणजे त्याने बेकायदेशीर कमावलेल्या पैशाचा उपभोग घेतला असेल म्हणून न्यायालयाने पत्नीला एक वर्षाची शिक्षा सुनावली. त्यामुळे हा निकाल आता चर्चेचा विषय बनला आहे.
पत्नीचे अपील लावले फेटाळून लावले
या प्रकरणात मुख्य आरोपी पती मृत झाल्याचे आढळले, त्यामुळे त्याच्या पत्नीला 1 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या शिक्षेला पत्नीने न्यायालयात आव्हान दिले होते, ते उच्च न्यायालयाने (High Court) फेटाळून लावले आणि ‘भ्रष्टाचार घरापासून सुरू होतो आणि गृहिणी जर भ्रष्टाचारात सहभागी असेल तर त्याला अंत नाही’ असे म्हटले. न्यायमूर्ती केके रामकृष्णन यांनी देवनायकीला तिरुची येथील भ्रष्टाचारविरोधी खटल्यांसाठी विशेष न्यायालयाने सुनावलेली एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा रद्द करण्यास नकार दिला. 2017 मध्ये देवनायकीच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानंतर तिचा पती शक्तीवेलचा मृत्यू झाला होता. मात्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधात शक्तीवेल यांची पत्नी देवनायकी यांनी अपील केले होते, मात्र न्यायालयाने (High Court) ते अपील फेटाळून लावत ही महत्त्वपूर्ण टिप्पणी केली.
काय म्हटले न्यायालयाने?
मदुराई उच्च न्यायालयाने (High Court) म्हटले आहे की, “सरकारी नोकराच्या पत्नीचे कर्तव्य आहे की आपल्या पतीला लाच घेण्यापासून रोखणे. लाचखोरीपासून दूर राहणे हेच जीवनाचे मूळ तत्वज्ञान आहे. जर कोणी लाच घेतली तर तो आणि त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होईल. जर त्यांनी बेकायदेशीरपणे कमावलेल्या पैशाचा उपभोग घेतला असेल तर त्यांना ते भोगावे लागेल. या देशात भ्रष्टाचार अकल्पितपणे बोकाळला आहे. भ्रष्टाचाराची सुरुवात घरापासून होते आणि घरची मालकिन जर भ्रष्टाचारात भागीदार असेल तर भ्रष्टाचाराला अंत नाही. देवनायकीला गैरमार्गाने मिळालेल्या पैशाचा फायदा झाला आणि आता तिला शिक्षा भोगावी लागेल.
(हेही वाचा उत्तर प्रदेशात Love Jihad; हिंदू तरुणीशी जबरदस्तीने ‘निकाह’ करून मुंबईत केले धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार)
उच्च न्यायालयाने (High Court) निरीक्षण केले की तिरुची डीव्हीएसी पोलिसांनी शक्तीवेल आणि त्याच्या पत्नीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता, त्यासंबंधी केस प्रलंबित असताना शक्तीवेलचा मृत्यू झाला. उच्च न्यायालयाने शक्तीवेलच्या पत्नीला दोषी ठरवत एक वर्षाचा कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावला. उच्च न्यायालय म्हणाले, “न्यायाधीशांनी ठोठावलेल्या शिक्षेत हस्तक्षेप करू नये. त्यामुळे त्यांनी बजावलेला जामीनपत्र रद्द करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community