विभिन्न भाषा, धर्म, राज्य, शहर यांच्यात विभागालेल्या भारताला क्रिकेट खेळ एकत्र आणतो. सध्या भारतात आयपीएलचे वारे वाहत आहेत. २८ मे रोजी आयपीएल २०२३ चा अंतिम सामना रंगला होता. मात्र प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका महिलेच्या कृतीमुळे सामन्याचा बेरंग झाला, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या मनात उमटली आहेत.
This woman slapped and hit this male officer like anything and the helpless guy couldn’t do anything. Is this woman empowerment? pic.twitter.com/m4sMZg0Lds
— ∆ (@TheNaziLad) May 28, 2023
भारत हा क्रिकेटप्रेमींचा देश आहे. त्यामुळे भारतात हजारो प्रेक्षकांना सामावून घेणारी अनेक स्टेडियम्स आहेत. त्यातील सर्वांत विशाल स्टेडियममध्ये रविवारी, २८ मे रोजी सामना खेळला जाणार होता. या मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन टीम्समध्ये खेळ रंगणार होता. आयपीएल २०२३ च्या सीजनची ती फायनल मॅच होती. दोन्ही संघाच्या चाहत्यांनी स्टेडियम खच्चून भरले होते. त्यावेळी स्टेडियममध्ये एक विचित्र घटना घडली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना तैनात करण्यात येते. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका महिलेने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
(हेही वाचा ChatGpt : नोकरी हवी? चॅटजीपीटीचा कसा कराल वापर?)
महिलेने तिथे तैनात असलेल्या तरूण पोलिसाच्या कानाखाली मारले. त्यामुळे तो पोलीस कर्मचारी जवळपास उभ्या उभ्याच जमिनीवर कोसळला. महिलेने हात उचललेला असताना सुद्धा पोलिसाने रागाच्या भरात प्रतिहल्ला केला नाही. तो गुपचूपपणे निघून गेला. महिलेने पोलिसावर का हात उचलला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या महिलेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.
पावसाने विकेट घेतली
मॅच चालू असताना अचानक पाऊस पडला. त्यामुळे २८ मे रोजी होणारा सामना २९ मे रोजी खेळवला जाणार आहे. कालच्याच तिकिटावर प्रेक्षक मॅच पाहू शकतात.
Join Our WhatsApp Community