मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावीत; मंत्री Nitesh Rane यांचे निर्देश 

99
मुंबईत देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी लवकरच धावणार; मंत्री Nitesh Rane यांचा विश्वास
  • प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्प हा स्थानिक मत्स्यव्यवसाय वाढविण्यासाठी तसेच रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मासेमारीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होणार असून मत्स्यउत्पादन वाढणार आहे.

मिरकरवाडा हा रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासात ‘मैलाचा दगड’ ठरणार असल्याचे मत मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केले. या प्रकल्पाची कामे विहित कालावधीत गतीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश त्यांनी सोमवारी मंत्रालयात घेतलेल्या आढावा बैठकीत दिले.

(हेही वाचा – BMC : पुलांची उभारणी करताना महानगरपालिका राखणार ‘या’ प्राधिकरणांशी सुसंवाद)

बैठकीला उपस्थित अधिकारी :
  • मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे
  • सहआयुक्त महेश देवरे
  • मिरकरवाडा प्रकल्पाच्या मत्स्यविकास अधिकारी अक्षया मयेकर
  • कोकण प्रादेशिक उपायुक्त नागनाथ भादुले

इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – Mumbai Airport वर ८ कोटींचा गांजा जप्त, दोघांना अटक)

कामांना गती द्यावी – मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांचा आदेश

प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना प्राधान्यक्रम देण्याचे निर्देश देत मंत्री नितेश राणे म्हणाले,

  • प्रकल्पांतर्गत संरक्षक भिंतीचे काम त्वरित हाती घ्यावे.
  • निविदा प्रक्रिया लवकर सुरू करण्यासाठी योग्य नियोजन करावे.
  • पावसाळ्यापूर्वी सर्व प्रकल्प पूर्ण झाले पाहिजेत, अन्यथा मोठा विलंब होऊ शकतो.
  • सर्व परवानग्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करावा, आणि पुढील १५ दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी.
मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यातील महत्त्वाची कामे :
  • पश्चिमेकडील लाटरोधक भिंतीची लांबी वाढविणे.
  • उत्तरेकडे लाटरोधक भिंत बांधणे.
  • नौकानयन मार्गातील गाळ काढणे.
  • भराव व सपाटीकरण करणे.
  • लिलावगृह उभारणे.
  • जाळी विणण्यासाठी दोन शेड बांधणे.
  • सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे.
  • मच्छिमारांसाठी दोन निवारा शेड बांधणे.
  • पूर्वेकडील ब्रेकवॉटर निष्कासित करणे.
  • अस्तित्वातील धक्का आणि जेट्टी दुरुस्ती करणे.

(हेही वाचा – Income Tax Bill : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची रिझर्व्ह बँकेच्या बोर्डाबरोबर महत्त्वाची बैठक)

सध्याची स्थिती :

या दुसऱ्या टप्प्यातील एकूण २२ कामांपैकी ३ कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांना बैठकीत दिली.

मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्प हा रत्नागिरीच्या आर्थिक आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून या प्रकल्पाच्या कामांना गती देण्यासाठी मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यासाठी ठोस नियोजन करण्यात यावे, असे आदेश त्यांनी बैठकीत दिले. परवानग्यांसाठी आवश्यक प्रक्रिया पुढील १५ दिवसांत पूर्ण करावी, असा स्पष्ट इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.