अरेरे…२५ वर्षीय कामगाराचा मशीनमध्ये हात अडकून तुटला! पण …

95

उत्तर प्रदेशाहून मुंबईत कामानिमित्ताने आलेल्या २५ वर्षीय तरुणाला महानगरी मुंबईने पोटापाण्याची संधी दिली. मालाडच्या एका कंपनीत त्याला कामही मिळाले, मात्र चक्क मशीनमध्येच हात अडकल्याने उजवा हात निखळून पडला. उजवा हात कोप-यापासून वेगळा होऊन खाली पडला. हा तरुणावरील अपंगत्वाची भीती ओढावलेली असताना कामगाराला तातडीने वर्सोवा येथील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल केले गेले. अवघ्या सात तासांत कामगाराचा तुटलेला हात पुन्हा बसवला गेला.

कसा झाला अपघात

१८ जानेवारी रोजी २५ वर्षीय विनोद गुप्ता यांचा उजवा हात कोल्ड प्रेस मशीनमध्ये अडकला. हात मनगटापासून कापला गेला. शरीरावरील मनगटाच्या वरच्या भागांवरील हात फ्रॅक्चर झाला. नजीकच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर विनोद गुप्ता यांना तातडीने वर्सोवा येथील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर रुग्णाने गमावलेला हात पुन्हा मिळवला. ही किमया कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयाच्या प्लास्टीक एण्ड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी विभागाने केली.

हात अपघातात गमावल्यास पहिले सहा तास खूप महत्त्वाचे असतात. या सहा तासांतच गमावलेला हात पुन्हा बसवता येतो. वैद्यकीय भाषेत याला ‘गोल्डन अवर’ असे संबोधले जाते. विनोद गुप्ताला अपघाताच्या तीन तासानंतर आणले गेले. पहिल्या सहा तासांत तुटलेल्या अवयवातील रक्तवाहिन्या तसेच स्नायू कार्यरत असतात त्यामुळे शरीरात त्यांना पुन्हा शस्रक्रियेत्या माध्यमातून बसवता येते. सहा तासानंतर रुग्णाला दाखल केल्यास शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता फारच कमी असते.
डॉ. काझी अहमद, प्लास्टीक अॅण्ड रिकस्ट्रक्टिव्ह सर्जरी विभाग, कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालय, वर्सोवा

कशी पार पडली शस्त्रक्रिया 

  • अपघातामुळे रुग्णाच्या हातातून सतत रक्तस्राव सुरु होता. शिवाय शरीरातील इतर प्रक्रिया सुरु राहाव्यात म्हणून डॉक्टरांची टीम काळजी घेत होती. रुग्णाच्या तपासणीनंतर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.
  • रुग्णालयाच्या प्लास्टीक एण्ड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी विभागाचे डॉ काझी अहमद आणि डॉ अमोल घालमे यांनी कापलेल्या हाताची सर्जिकल साफसफाई केली गेली. निखळलेल्या शरीरातील उजव्या हाताला लागलेली धूळ तसेच हातावरील मृत पेशीही डॉक्टरांनी साफ केल्या. शस्त्रक्रियेच्या आधी रक्त तपासण्या आणि एक्सरे तपासणी केली गेली.
  • उजव्या हाताचे फ्रॅक्चर झालेले हाड डॉ ऑर्थोपॅडिक सर्जन डॉ अविनाश दाते यांनी पूर्ववत बसवले. त्याकरिता डॉ दाते यांनी टायटॅनियम इलास्चीक टेन्स नेल वापरुन फ्रॅक्चर हात पुन्हा बसवला.

(हेही वाचा वाघ बिबट्या-मानव संघर्ष सुरु; वाघांना नैसर्गिक अधिवास देण्याची मागणी)

अन् हात पुन्हा बसवला…

डॉ. काझी अहमद आणि डॉ. अमोल घालमे या कन्सल्टन्ट प्लास्टीक सर्जनच्या टीमने मायक्रोवस्क्युलर सर्जरी केली. या शस्त्रक्रियेत उजव्या हाताचे हाड आणि रक्तवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली . तुटलेले उजव्या हाताचे हाड आणि शरीरातील मनगटावरील हाड पुन्हा जोडण्यासाठी मायक्रोसर्जरी केली गेली. हाताच्या दोन मुख्य धमन्या, रक्तवाहिन्या, स्नायू तसेच स्नायूबंध जोडले गेले आणि कापलेला हात पुन्हा बसवला गेला. अशा त-हेने पुन्हा तुटलेला हात शरीराला जोडून रक्तप्रवाह पुन्हा सुरु करण्यात आला. शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर रुग्णाला तीन दिवस इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. विनोद गुप्तावर सतत ड्रेसिंग तसेच स्किन ग्राफ्टिंगही केली गेली. त्यानंतर तीन आठवड्यापूर्वी विनोद गुप्ता यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला गेला.

अपघातामुळे मी आता कायमचा अपंग झालो या विचारानेच मी वैफल्यग्रस्त झालो. मी शुद्धीवर होतो पण सतत आता आपण हात कामयचा गमावला, पोटापाण्याचे काय ? हा प्रश्न सतावत होता. पण डॉक्टरांनी मला नवे जीवनदान दिले. काही काळानंतर मी पूर्वीप्रमाणे उजव्या हाताने सर्व कामे करु शकणार. मी सर्वसामान्य माणसाप्रमाणे जगू शकणार.
– विनोद गुप्ता, रुग्ण

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.