भावाने छाटली भावाची बोटे! ‘हे’ होते कारण…

एका लहान भावाने मोठ्या भावाच्या एका हाताची दोन बोटे तलवारीने छाटल्याचा प्रकार गोवंडीच्या टाटा नगर येथे समोर आला आहे. सासूच्या घराला भाऊ लाथा का मारतो, असा जाब विचारल्यामुळे संतापलेल्या लहान भावाने हा हल्ला केल्याचे समोर आले आहे.

स्वतःच्या भावावर तलवारीने डोक्यात वार

सलीम शेख (३८) असे जखमी भावाचे नाव आहे. सलीम हा पत्नी आणि दोन मुलींसह गोवंडी येथील टाटा नगर येथे राहण्यास आहे. शनिवारी रात्री सलीमचा लहान भाऊ जावेद (३५) याने सलीमच्या सासुरवाडीत जाऊन आरडाओरडा करून दाराला लाथा मारून दार तोडण्याचा प्रयत्न केला. शेजारीच राहणाऱ्या सलीम आणि त्याची पत्नी निलोफर हे दोघे घराबाहेर आले व जावेदला समजावू लागले. जावेद आणि त्याचा एक मित्र हातात तलवार घेऊन उभे होते, जावेद याच्या भावावर संपत्ती वरून वाद सुरूच होता, त्यात तो जावेदला बोलायला आल्यामुळे जावेद संतापला आणि त्याने स्वतःच्या भावावर तलवारीने डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्ला रोखण्यासाठी सलीम याने डोक्यावर हात ठेवताच तलवारीचा घाव सलिमच्या हातावरील बोटावर होऊन सलीमच्या एका हाताची दोन बोटे छाटली गेली.

(हेही वाचा : अखेर भाजपाने मनसेला बिनशर्त स्वीकारले!)

देवनार पोलिसांकडून गुन्हा दाखल

स्थानिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, जावेदने तलवार त्याच्यावर उगारून धमकी देऊन पळून गेला. जखमी जावेदला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू केले आहे. देवनार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून जावेद याला अटक केली असून त्याचा दुसरा सहकारी फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here