Khanapur : पुरातन ‘बाहुबली’ मूर्तीची चोरी, ग्रामस्थ आक्रमक

ग्रामस्थांची जमीन मालकाविरोधात तक्रार

105
Khanapur : पुरातन 'बाहुबली' मूर्तीची चोरी, ग्रामस्थ आक्रमक
Khanapur : पुरातन 'बाहुबली' मूर्तीची चोरी, ग्रामस्थ आक्रमक

कर्नाटकात खानापूर (Khanapur) तालुक्यातील बिडिनजीक गोलिहळी परिसरातील पुरातन काळातील जैन तीर्थकर बाहुबलीची (Jain Tirthakar Baahubali) मूर्ती चोरीला गेल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत जमीन मालकांची नंदगड येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली. पोलिसांनी मूर्ती घेऊन गेलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

( हेही वाचा : विधानसभेच्या १२ जागांबाबत तडजोड नाही : Marxist Communist Party

दरम्यान (Jain Tirthakar Baahubali) जैन तीर्थकर बाहुबली यांची मूर्ती चोरीला गेल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत पोलिस ठाण्यात दि ३० सप्टेंबर रोजी ठाण मांडले. तसेच ग्रामस्थांनी प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिडिजवळील गोलिहळी येथील शंकर गोळेकर (Shankar Golekar) आणि त्याचे बंधू बसप्पा गोळेकर (Basappa Golekar) यांनी जमिनीवरील प्लॉट पाडून जमिनीची विक्री करण्याचा निर्णय घेतला. मात्र तेथील जमिनीवर जैन तीर्थकर बाहुबली(Jain Tirthakar Baahubali) यांची मूर्ती असल्याने प्लॉटची विक्री होत नव्हती. मात्र अज्ञात व्यक्ती हीच मूर्ती घेऊन पळून जातानाचे शाळकरी मुलांनी पाहिले. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच अज्ञातावर कारवाई करत मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करण्याची मागणी केली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.