Dadar Shivaji Park Zoo : दादरच्या प्राणी संग्रहालयातून प्राण्यांची चोरी; ६ अजगर, २ घोरपड, १ विदेशी पाल आणि सरडा बेपत्ता

दादर शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या वादग्रस्त 'मरीन अक्वा झु प्राणी संग्रहालय' येथून प्राण्याची चोरी झाल्याची तक्रार प्राणी संग्रहालयांच्या एका ट्रस्टीने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

378
Dadar Shivaji Park Zoo : दादरच्या प्राणी संग्रहालयातून प्राण्यांची चोरी; ६ अजगर, २ घोरपड, १ विदेशी पाल आणि सरडा बेपत्ता
Dadar Shivaji Park Zoo : दादरच्या प्राणी संग्रहालयातून प्राण्यांची चोरी; ६ अजगर, २ घोरपड, १ विदेशी पाल आणि सरडा बेपत्ता

दादर शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या वादग्रस्त ‘मरीन अक्वा झु प्राणी संग्रहालय’ येथून प्राण्याची चोरी झाल्याची तक्रार प्राणी संग्रहालयांच्या एका ट्रस्टीने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अनोळखी व्यक्ती विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. चोरीला गेलेल्या प्राण्यांमध्ये ६ अजगर, २ घोरपडी, १ विदेशी जातीची पाल आणि विदेशी जातीचा सरडा या प्राण्यांचा समावेश आहे. (Dadar Shivaji Park Zoo)

दादर शिवाजी पार्क या ठिकाणी ‘मरीन अक्वा झु प्राणी संग्रहालय’ आहे. हे प्राणी संग्रहालय मागील काही महिन्यांपासून वादात अडकले आहे. या प्राणी संग्रहालयातील प्राणी शेजारच्या तरण तलावात जात असल्याच्या तक्रारी महानगर पालिकेकडे दाखल झालेल्या होत्या. काही आठवड्यापूर्वी या प्राणी संग्रहालयातील मगरीचे पिल्लू शेजारच्या तरण तलावात आढळून आली होती. वनविभाग तसेच महानगर पालिकेने हे प्रकरण गंभीरपणे घेऊन चौकशी सुरू केली होती. तसेच हे प्राणी संग्रहालय बेकायदेशीरपणे चालविले जात असल्याचे चौकशीत समोर आले होते. (Dadar Shivaji Park Zoo)

(हेही वाचा – Deepak Kesarkar : प्रत्येक दलित वस्ती जवळ उभारणार ग्रंथालय आणि रिडिंग रूम)

काही दिवसांपूर्वी महानगर पालिकेने या प्राणी संग्रहालयावर तोडक कारवाई केली आहे. या प्राणी संग्रहालयाचे ट्रस्टी पृथ्वीराज पवार यांनी बुधवारी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात प्राणी संग्रहालयातून प्राणी चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत पवार यांनी म्हटले आहे की, मंगळवारी रोजी सकाळी ९ वाजता सोमया विद्याविहार कॅम्पस स्कुल येथे प्राणी प्रदर्शन होते, त्या साठी पवार हे मरिन अ‍ॅक्वा झु प्राणी संग्रालय येथुन प्रदर्शनासाठी प्राणी घेऊन जाण्यासाठी सकाळी साडे सात वाजता आले असता तेथे असलेले ६ अजगर विदेशी प्रजातींचे, २ घोरपड विदेशी प्रजातींचे १ पाल विदेशी प्रजातीची, १ सरडा विदेशी प्रजातीचे प्राणी त्यांना कंपाउंडमध्ये मिळून आले नाहीत. (Dadar Shivaji Park Zoo)

त्यांनी प्राण्यांचा आजुबाजुला शोध घेतला असता ते मिळुन आले नाहीत. तेव्हा वरील प्राणी कोणीतरी कंपाऊंडमध्ये प्रवेश करुन चोरी केल्याचा संशयावरून पवार यांनी मरिन अ‍ॅक्वा झु प्राणी संग्रालयाचे अध्यक्ष युवराज नंदकुमार मोघे यांना याबाबत सूचना दिली. त्यानंतर याची सूचना पोलिस हेल्पलाइन क्रमांकावर दिली. त्यानंतर पवार यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यास तक्रार दाखल केली. चोरीला गेलेल्या प्राण्यांची किंमत जवळपास साडेचार लाख रुपये असल्याचे तक्रारीत म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तपास सुरू आहे. (Dadar Shivaji Park Zoo)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.