बँकांमध्ये पडून आहे कोट्यवधींचा बेवारस पैसा, RBI शोधणार वारस

RBI च्या वार्षिक अहवालातून एक धक्कादायक माहिती मिळत आहे. आरबीयकडे असलेल्या बेवारस(Unclaimed) रक्कमेत वाढ झाली आहे. 2021-22 या वर्षात देशातील विविध बँकांमध्ये असलेली दावा न केलेली रक्कम 48 हजार 262 रुपयांपर्यंत वाढली आहे. मागील आर्थिक वर्षात ही रक्कम 39 हजार 264 कोटी रुपये इतकी होती. देशातील 8 राज्यांमध्ये ही रक्कम वाढली असून, आता आरबीआयकडून या रक्कमेचे दावेदार शोधण्यासाठी मोहीम सुरू करण्यात येणार आहे.

काय आहे Unclaimed रक्कम?

ग्राहकांनी त्यांच्या खात्यातून 10 वर्षांपर्यंत कोणताही आर्थिक व्यवहार केला नाही तर अशा खात्यांमध्ये पडून राहिलेल्या रक्कमेला Unclaimed रक्कम म्हटले जाते, असे आरबीआयने सांगितले आहे. बचत खाते,चालू खाते,मुदत ठेव आणि रिकरिंग डिपॉझिट खात्यांमध्ये अशी अनक्लेम्ड रक्कम असू शकते. अशी खाती निष्क्रिय करण्यात येतात.

(हेही वाचाः सरकारी कर्मचा-यांचं होणार प्रमोशन, पगारात होणार भरघोस वाढ! सरकारची मोठी घोषणा)

या राज्यांमध्ये प्रमाण जास्त

या अनक्लेम्ड रक्कमेपैकी बहुतांश रक्कम ही महाराष्ट्र,तामिळनाडू,पंजाब,गुजरात,पश्चिम बंगाल,कर्नाटक,बिहार आणि तेलंगणा या राज्यांतील बँकांमध्ये जमा असल्याची माहिती आरबीआयच्या अधिका-यांकडून देण्यात येत आहे. ही रक्कम शोधण्यासाठी आता आरबीआयकडून या राज्यांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

अशी मिळवता येईल रक्कम

खातेधारकाचा मृत्यू,मृत व्यक्तीच्या खात्याबद्दल कुटुंबातील सदस्यांना नसलेली माहित किंवा नॉमिनीशिवाय असलेली खाती यांमध्ये ही अनक्लेम्ड रक्कम पडून असते. या निष्क्रिय खात्यांमधील रक्कम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ठेवीदार शिक्षण व जागरुकता निधी(DEAF)मध्ये जमा करण्यात येते. ही रक्कम परत मिळवण्यासाठी संबंधित बँकेशी संपर्क साधून किंवा बँकांच्या वेबसाईटवर ही माहिती उपलब्ध असते.

(हेही वाचाः हे आहेत मुंबईतील पहिले मराठी प्राध्यापक, इंग्रजांनीही केला होता सन्मान)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here