राम मंदिराचे बांधकाम 2024 पर्यंत पूर्ण होणार नाही? हे आहे कारण

141

अयोध्येत तयार होणारे राम मंदिर 2024 पर्यंत पूर्ण होईल, असे दावे केले जात आहेत, पण हे दावे फोल ठरण्याची शक्यता आहे. कारण मंदिराच्या बांधकामासाठी लागणा-या गुलाबी दगडाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. राम मंदिराच्या बांधकामासाठी 4.7 लाख घनफूट गुलाबी दगडाची गरज आहे, मात्र आतापर्यंत 70लाख घनफूट दगडच इकडे पोहोचला आहे. म्हणजे एकूण मागणीच्या केवळ 15 टक्के दगड उपलब्ध आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार का? यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

गुलाबी दगडाची टंचाई कशामुळे?

खाण विभागाने लीजवर दिलेल्या 41 खाणींपैकी केवळ 14 खाणीत गुलाबी दगड उपलब्ध आहे. मे अखेरीस खाण लीज धारकांकडे सोपवली जाईल, त्यामुळे खनन सुरु होण्यासाठी 15 जून उजाडणार आहे. खनन सुरु झाल्यानंतर, अवघ्या 15 दिवसांतच पाऊस सुरु होणार असल्याने, खननचे काम दिवाळीनंतरच सुरु होण्याची शक्यता आहे. दिवस-रात्र खनन झाले, तरीही आवश्यकतेनुसार, दगड मिळण्यास 2 वर्षे लागतील. खाणीतून दगड मिळवल्यानंतर, हा दगड घडवण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागेल. त्यामुळे 2024 पर्यंत राम मंदिर पूर्ण होऊ शकेल की नाही, हा प्रश्नच आहे.

( हेही वाचा: गुन्हेगाराला ‘गुंडा’ का बोलतात माहितीय का? वाचा ‘गुंडा’ या शब्दाच्या उत्पत्तीची भन्नाट जन्मकथा )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.