Water Shortage : मुंबईकरांवर पुन्हा पाणी कपातीचे संकट?

मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करायचा नसेल तर वरुण राजा प्रसन्न होणे आवश्यक आहे.

209
Water Shortage : मुंबईकरांवर पुन्हा पाणी कपातीचे संकट?
Water Shortage : मुंबईकरांवर पुन्हा पाणी कपातीचे संकट?

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये ९० टक्के एवढा पाणी साठा जमा झाल्याने येत्या सप्टेंबर महिन्यात पुरेसा पाऊस न पडल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता आहे. पुढील पंधरा दिवसांमध्ये उपलब्ध असणाऱ्या पाणी साठ्याच्या आधारे आढावा घेतला जाणार असून त्यावेळी जो पाणीसाठा उपलब्ध असेल त्यानुसार दहा ते पंधरा टक्के एवढे पाणी कपात लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात ही पाणी कपात येत्या १५ सप्टेंबरला जो पाणीसाठा उपलब्ध असेल त्यावर आधारित असेल असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, आणि तुळशी या सात तलावांमधून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर्स एवढा पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी या सर्व धरण तथा तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. २ सप्टेंबर २०२३ रोजी १३ लाख १२ हजार दशलक्ष लिटर्स अर्थात ९०.६५ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे. महापालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी शनिवारी सर्व धरणांच्या पाहणी दरम्यान प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीमध्ये, सर्व धरणातील विद्यमान पाणी साठ्याच्या आधारे अशा प्रकारच्या निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली आहे.

सध्या अनेक भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये ९० टक्के एवढा पाणीसाठा असला तरीही सप्टेंबर महिन्यात हा पाऊस न पडल्यास पाणी कपातीची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये एकूण पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पुढील निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. जर सप्टेंबर महिन्यात पाऊस न पडल्यास पंधरा तारखेपर्यंत याचा आढावा घेऊन हे कपात जाहीर केली जाईल. मात्र, सप्टेंबर महिन्यात पुरेसा पाऊस पडून पुरेसा साठा निर्माण झाल्यास कपात लागू करण्याची शक्यता नसेल.

(हेही वाचा – Say Bharat instead of India : ‘इंडिया’ नको ‘भारत’ म्हणा – सरसंघचालक मोहन भागवत)

परंतु एक ऑक्टोबर रोजी मुंबईला आवश्यक असणाऱ्या १४ लाख ४७ हजार दशलक्ष पाण्याच्या तुलनेत जल पाणीसाठा कमी असेल तर, त्यानुसार येत्या पंधरा तारखेपर्यंत कपातीचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईकरांना कपातीचा सामना करायचा नसेल तर वरुण राजा प्रसन्न होणे आवश्यक आहे. आणि पुढील काही दिवसांमध्ये तलावातील पाण्याची पातळी थेंबे थेंबे पाणी साचे याप्रमाणे शंभर टक्के एवढा पाणीसाठा जमा होणे आवश्यक आहे. आणि जर धरण क्षेत्रात पुरेसा पाणी साठा जमा झाला तर मुंबईकरांवर कपातीच्या कोणत्याही संकट जाणार नाही. मात्र, पंधरा तारखेपर्यंत जो पाणीसाठा उपलब्ध असेल त्यावरच पाणी कपातीबाबतचा पुढील निर्णय घेतला जाईल असे माळवदे यांनी शक्यता वर्तवली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.