तुम्हाला जर सांगितलं की, या पृथ्वीवर एक असा प्राणी आहे ज्याच्या दुधात अल्कोहोल असतं तर तुम्ही विश्वास ठेवाल का? माणूस काही प्राण्यांचे दूध पितो. गाय, म्हैर, गाढव, उंट आणि बकरी अशा प्राण्यांच्या दुधाचं सेवन माणूस करत असतो. त्यात म्हैस आणि गायीचं दूध खूपच प्रचलित आणि सामान्य आहे. मात्र जगाच्या पाठीवर एक असा प्राणी आहे ज्याचं दूध माणसाच्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. निसर्गात अनेक चित्रविचित्र गूढ गोष्टी दडल्या आहेत, ज्यापासून सर्वसामान्य माणूस अनभिज्ञ आहे. जंगलामध्ये तर अनेक रहस्य दडलेली आहेत. अनेक प्राणी, झाडे आपलं वेगळेपण टिकवून आहेत.
हत्ती हा अवाढव्य प्राणी असला तरी तो माणसाचा मित्र मानला जातो. पूर्वी राजा महाराजांकडे हत्ती असायचे, युद्धातही त्यांचा वापर व्हायचा. नंतरच्या काळात सर्कशीत त्यांचा वापर होऊ लागला. एवढ्या मोठ्या आणि बलाढ्य प्राण्यावर माणूस अधिपत्य मिळवतो. मात्र हत्तीचं दूध माणसासाठी चांगलं नसतं. कारण असं म्हणतात की हत्तीच्या दुधात अल्कोहोल असतं. असा अंदाज लावला गेला आहे की हत्ती ऊसाचं सेवन अधिक प्रमाणात करत असल्यामुळे हत्तीच्या दुधात अल्कोहोलचं प्रमाण दिसून येतं. ऊसामध्ये देखील हे तत्व सापडतं. तुम्हाला जानून आश्चर्य वाटेल की हत्तीच्या दुधात ६०% अल्कोहोल असतं. म्हणजे कुणी या दुधाचं सेवन केलं तर तो नक्कीच झिंगेल.
(हेही वाचा ट्रेनच्या तिकिटावर कोण-कोणते शुल्क आकारले जातात? जाणून घ्या…)
एक संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की हत्तीच्या दुधात असे काही केमिकल्स मिळाले आहेत, जे माणसासाठी धोकादायक असू शकतात. दुग्धजन्य प्राण्यांच्या दुधात ऑलिगोसॅकराइड सामग्री कमी प्रमाणात असते परंतु मानव आणि हत्तीच्या दुधात यांचं प्रमाण लक्षणीय असतं. आफ्रिकन हत्तीच्या दुधात लॅक्टोज आणि ऑलिगोसॅकराइड प्रमाण अधिक असते. म्हणूनच हत्तीच्या दुधाचं सेवन माणूस करत नाही.
Join Our WhatsApp Community