मुंबईत H1N1 सह जलजन्य आजारांच्या रुग्ण संख्येत होतेय वाढ

467
मुंबईत H1N1 सह जलजन्य आजारांच्या रुग्ण संख्येत होतेय वाढ

मुंबईत सध्या मलेरिया, डेंग्यू लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांच्या संख्येत मागील आता घट झाल्याचे दिसून येत असून एच१एन१ अर्थात फ्लू व जलजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत मात्र काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एच१एन१ या आजारांचे १ ते १५ जून या कालावधीत १० रुग्ण आढळून आले होते, तर आता १ते १५ जुलै या कालावधीत ५३ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या साथरोग नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून मुंबईतील ६ लाख ८९ हजार ४३३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. (H1N1)

जलजन्य रोगासाठी घरोघरी सर्वेक्षण करताना ग्रॅस्ट्रोसाठी ओआरएस वितरण हे ६७ हजार ५८३ एवढ्या लोकांना करण्यात आले. तसेच मलेरिया नियंत्रण अंतर्गत १ लाख ४९ हजार ८३२ घरांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ९२२१ ऍनोफिलीस डासांच्या उत्पत्तीची संख्या आढळून आली. तर डेंग्यू प्रतिबंधक नियंत्रण अंतर्गत ६ लाख ८० हजार ८२७ घरांची तपासणी करण्यात आली. यात ७ लाख ३६ हजार ५४२ कंटेनरची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये १२ हजार ५५९ एडिस डासांच्या उत्पत्तीची स्थाने आढळून आली आहे. (H1N1)

डेंगी आणि हिवताप (मलेरिया) आजारांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियंत्रणासाठी महापालिकेमार्फत लघुपटाच्या माध्यमातून जनजागृती मोहिम राबवण्यात येणार आहे. भाग मच्छर भाग ही विशेष जनजागृती मोहिमेसाठी मराठी, हिंदी, चित्रपट सृष्टीतील अभिनेते तसेच सेलिब्रेटी, प्रसिद्ध व्यक्ती यांचाही सहभाग या मोहिमेसाठी असेल. (H1N1)

(हेही वाचा – Ashadhi Ekadashi निमित्त पंढरपूरसाठी विशेष ट्रेन रवाना)

जलजन्य रोगांसाठी खबरदारीचे उपाय (गॅस्ट्रो, हिपॅटायटीस, टायफॉइड) :
  • गॅस्ट्रोपासून बचाव करण्यासाठी रस्त्यावरील/उघडे अन्न खाणे टाळा.
  • जेवण्यापूर्वी हात धुवा किंवा हँड सॅनिटायझर वापरा.
  • पाणी उकळून प्या.
H1N1/फ्लूच्या प्रतिबंधासाठी सल्ला :   
  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
  • शिंकताना किंवा खोकताना आपले नाक टिश्यू किंवा रुमालाने झाकून ठेवा.
  • साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा.
  • डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळा.
  • अति जोखमीच्या व्यक्तींची प्रतिकारकशक्ती कमी असल्याने त्यांना एच१एन१ (फ्लू) चा धोका अधिक प्रमाणात जाणवतो, एच१एन१ चा संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर करावा. (H1N1)
डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी सल्ला/उपाययोजना : 

नागरिकांनी आपल्या घरामध्ये, घराच्या आजूबाजूला व इमारतींच्या परिसरात कुठेही पाणी साचलेले असणार नाही, याची दक्षता घ्यावी. साचलेल्या पाण्यातच डासांची मादी अंडी घालते व डासांची उत्पत्ती स्थळे तयार होतात ही बाब लक्षात घेता साचलेले पाणी आढळून आल्यास असता तात्काळ निचरा करावा.

टायर, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकच्या बाटल्या व बाटल्यांची झाकणे, झाडांच्या कुंड्या व त्या कुंड्याखालील तबकडी, फ्रीजच्या खालील डिफ्रॉस्ट ट्रे यामध्ये पाणी साचून राहणार नाही, याची दररोज पाहणी करावी व दक्षता घ्यावी.

फेंगशुई, मनी प्लांट यासारख्या शोभेच्या रोपट्यांचे पाणी नियमितपणे बदलावे.

दिवसा आणि रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधात्मक (Mosquito Repellent) औषधांचा वापर करावा.

जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर यांसारख्या वस्तू जमा करणे टाळावे, अशा अडगळीत पाणी साचून डासांची उत्पत्ती होऊ शकते.

ताप आल्यास जवळच्या बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मुंबई महानगरपालिका रुग्णालयात त्वरित संपर्क साधावा व समूळ उपचार पूर्ण करावा. (H1N1)

लेप्टोस्पायरोसिसच्या प्रतिबंधासाठी सल्ला :
  • साचलेल्या पावसाच्या पाण्यातून चालणे टाळा. शक्य असेल तेव्हा गम बूट घाला.
  • अधिक माहितीसाठी घराजवळच्या म.न.पा आरोग्यकेंद्र/दवाखाना/रुग्णालयात जाऊन त्वरित सल्ला घ्या. (H1N1)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.