तिसऱ्या लाटेच्या अंतिम टप्प्यात रुग्णसंख्या खालावत असताना, पहिल्यांदाच जवळपास पावणेदोन वर्षांनंतर राज्यात बुधवारी एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. 1 एप्रिल 2020 नंतर पहिल्यांदाच राज्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नसल्याची माहिती आरोग्य विभागाचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
तरीही सतर्कता बाळगणे आवश्यक
आता राज्यात केवळ 5 हजार 643 रुग्ण उरले आहेत. या आकडेवारीवरून कोरोनाची तिसरी लाट ही जवळपास संपुष्टात आल्याचे दिसत आहे. पण तरीही हा संपूर्ण मार्च महिना सतर्कता बाळगायला हवी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
(हेही वाचाः २०० अंगणवाड्यांचे रूपडं पालटणार! जाणून घ्या अनोखा उपक्रम)
अशी आहे राज्यातील स्थिती
राज्यात बुधवारी कोरोनाचे 544 नवे रुग्ण आढळून आले. तर 1 हजार 7 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98.02% नोंदवले गेले आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी पुणे शहर आणि औरंगाबादमध्ये नव्या ओमायक्रॉनची नोंद झाली. एकट्या पुण्यात 37, तर औरंगाबादमध्ये नव्याने ओमायक्रॉनचा एक रुग्ण सापडला. मात्र ओमायक्रॉनमुळे राज्यावर अचानक ओढवलेली तिसरी लाट नियंत्रणात असल्याने काळजी करण्याचे कारण नाही, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
(हेही वाचाः ‘या’ बॅंकेच्या खातेदार-ठेवीदारांना दिलासा!)
Join Our WhatsApp Community