- विशेष प्रतिनिधी, मुंबई
चीनमध्ये सुरू असलेल्या मानवी ‘मेटान्यूमोव्हायरस’ (HMPV) या विषाणूच्या साथ उद्रेकाबाबत प्रसारमाध्यमातून विविध बातम्या प्रकाशित होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहर व उपनगरात असा Human Metapneumo Virus (HMPV) बाधित कोणताही रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत देण्यात येत आहे. तथापि, नागरिकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
आरोग्य सेवा संचालनालय, पुणे यांनी ३ जानेवारी २०२५ रोजी याबाबत एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत, याबाबतची माहिती मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. (HMPV)
(हेही वाचा – Santosh Deshmukh Murder : देशमुख हत्याप्रकरणानंतर राज्यात जातीयद्वेष पसरवण्याचा प्रयत्न)
मानवी मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एच. एम. पी. व्ही.) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे, ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे, जो सामान्यतः आर. एस. व्ही. आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडस् मध्ये वर्ष २००१ मध्ये आढळला होता. याअनुषंगाने आरोग्य सेवा महासंचालनालय (डी. जी. एच. एस.) आणि संचालक, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एन. सी. डी. सी. दिल्ली) यांनी दिनांक ०३ जानेवारी २०२५ रोजी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. (HMPV)
चीनमध्ये आढळून आलेला विषाणू Human Metapneumo Virus (HMPV) अहवालाबाबत चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भीतीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही.
सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापि, खबरदरीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनांच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये यासंदर्भातील सूचनाचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. (HMPV)
(हेही वाचा – Reliance New IPO : रिलायन्सचा नवीन आयपीओ याच वर्षी येणार बाजारात)
हे करा –
● जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे.
● साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवावेत.
● ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहावे.
● भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक खावे.
● संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुवीजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्यावी.
हे करू नये –
● हस्तांदोलन.
● टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर.
● आजारी लोकांशी जवळचा संपर्क
● डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.
● सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.
● डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community