गेल्या काही वर्षांत मुंबई – ठाण्याची (Thane Police) लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या ६७ लाखांच्या घरात आहे. मात्र या अफाट लोकसंख्येच्या संरक्षणासाठी फक्त दहा हजारांचे पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. आकडेवारीत सांगायचे झालेच तर ६६८ नागरिकांमागे फक्त एक पोलीस कर्मचारी आहे. त्यामुळे जिल्हातील कायदा आणि सुव्यवस्था राखताना पोलिसांची दमछाक होते आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांची अधिक गरज निर्माण झाली आहे. (Thane Police)
माहितीनुसार, ठाणे पोलीस (Thane Police) दलात २ हजार ७३० अधिक पोलिसांची भरती करणे अत्यंत आवश्यक आहे.
(हेही वाचा –Sameer Wankhede : समीर वानखेडे यांना दिल्ली हायकोर्टाचा तात्पुरता दिलासा)
या पदांवर आवश्यकता
पोलीस निरीक्षक – २२
सहायक पोलीस निरीक्षक – ११८
पोलीस उपनिरीक्षक – १७८
सहायक पोलीस उपनिरीक्षक – १५७
हवालदार – ८९३
पोलीस शिपाई – १ हजार १५९
चालक – २०३
ठाणे शहरात पोलिसांसोबतच (Thane Police) चांगल्या वाहनांची देखील गरज आहे. पोलिसांच्या ताफ्यात वाहनांची कमी असल्याने त्यांना संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात अडचणी येत आहे.
हेही पहा –
ठाणे पोलीस (Thane Police) आयुक्तालयाच्या हद्दीत या प्रमुख शहरांचा समावेश होतो.
– ठाणे
– भिवंडी
– कल्याण, डोंबिवली
– अंबरनाथ
– बदलापूर
– उल्हासनगर