‘सर्व धर्माच्या धार्मिक संपत्तीसाठी एकच कायदा हवा’; Vishwa Hindu Parishad ची मागणी  

विहिंप' ने 'वक्फ' 'जेपीसी'ला पत्र

95

“देशातील सर्व धर्मांच्या धार्मिक मालमत्तांच्या (religious property Law) व्यवस्थापनासाठी एकच कायदा असावा,” असे ‘विश्व हिंदू परिषदे’ने (VHP) ‘विहिंप’चे ‘वक्फ’ सुधारणा कायद्यासाठी स्थापन ‘संयुक्त संसदीय समिती’स (जेपीसी) सुचवले आहे. विहिंप’ ने आपल्या पत्रात म्हटले आहे की, “वक्फ’ची (Waqf) व्याख्या म्हणजे कोणत्याही जंगम किंवा स्थावर मालमत्तेचे धार्मिक किंवा धर्मादाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्याही उद्देशासाठी कायमचे समर्पण करणे एकदा कोणतीही मालमत्ता अशा प्रकारे समर्पण केली की, ती सर्वशक्तिमान अल्लाची मालमत्ता बनते आणि त्याच्याकडे निहित होते.” (Vishwa Hindu Parishad)

त्याचप्रमाणे, ”हिंदू त्यांच्या मंदिरांच्या देखभालीसाठी आणि धार्मिक किंवा धर्मादाय कारणांसाठी जंगम किंवा अचल मालमत्ता देवांना समर्पित करतात. ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि शीख यांसह इतर धर्मांचे अनुयायीदेखील त्यांची मालमत्ता धार्मिक किंवा धर्मादाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उद्देशांसाठी समर्पित करतात. भारतीय संविधानाच्या (Constitution of India) पत्रात म्हटले आहे की, “वक्फ’ची व्याख्या म्हणजे कोणत्याही जंगम किंवा स्थावर मालमत्तेचे धार्मिक किंवा धर्मादाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्याही उद्देशासाठी कायमचे समर्पण करणे. ‘कलम ४४’मध्ये (Section 44) अशी तरतूद आहे. की, राज्य संपूर्ण भारताच्या प्रदेशात नागरिकांसाठी एकसमान नागरी संहिता सुरक्षित करण्याचा प्रयत्न करेल. त्यानुसार धार्मिक मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी एकच कायदा असावा,” असे ‘विहिंप’ने म्हटले आहे.

(हेही वाचा – Kho-Kho World Cup : पुढचा खो-खो विश्वचषक भारताबाहेर बर्मिंगहॅममध्ये होणार आयोजित)

“कायद्याची व्याप्ती सर्व धर्मांच्या मालमत्तांपर्यंत वाढवण्याची वेळ आली आहे. ‘वक्फ कायद्या’त सुधारणा करण्याचा विचार केला जात असेल, तर या संधीचा वापर करून त्यावर विचार केला पाहिजे. तथापी, आवश्यक असल्यास, एका धर्माच्या गरजा, शिकवणी आणि परंपरा इतर धर्मांपेक्षा वेगळ्या असल्या पाहिजेत, यासाठी काही अपवाद आणि विशेष तरतुदी केल्या जाऊ शकतात,” असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.