वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंग मंदिरा जवळील २४ व्या रस्त्यावरून जाणाऱ्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या ६०० मीमी व्यासाच्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात गळती (Water Cut) होत आहे. त्यामुळे ही गळती दूर करण्यासाठीच महापालिकेच्या वतीने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील आसपासच्या परिसरांना शुक्रवारी सायंकाळी आणि रात्री होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार आहे.
वांद्रे पश्चिम बालगंधर्व रंग मंदिराजवळ, पाली हिल जलाशयाला जोडल्या गेलेल्या ६०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर २४ वा रोड येथे गुरुवारी रात्री नऊच्या दरम्यान गळती दिसून आली. या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात होते. या जलवाहिनीवर जमिनी खाली ही प्रचंड गळती आढळून आली असून याच्या दुरुस्तीचे काम शुकावारी सकाळी ०८ डिसेंबर २०२३ रोजी हाती घेतले जाणार आहे. या दुरुस्तीच्या कामाचा कालावधी हा खोदकामानंतर आणि जलवाहिनीचे किती नुकसान झाले याचे मूल्यांकन केल्यानंतर ठरवले जाणार आहे.
(हेही वाचा Air Pollution : धुळीचे प्रदुषण नियंत्रणासाठीच्या भाडेतत्वावरील मशिन्सवर भर, दोन यंत्रे महापालिकेच्या ताफ्यात)
त्यामुळे या कालावधीत सायंकाळी ५.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत खार पश्चिम येथील दांडा कोळीवाडा, चुईम गाव, आदी परिसरात आणि खार पश्चिम डॉ. आंबेडकर रोड व खार पश्चिम भाग या परिसरात रात्री १० ते ०१ या कालावधीत होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. परिणामी खार पश्चिम भागाला संध्याकाळी आणि रात्री या वेळात पुरवठा होणाऱ्या भागात पाणी पुरवठा खंडित (Water Cut) राहणार असल्याची माहिती जल अभियंता विभागाने दिली आहे.
Join Our WhatsApp Community